शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातून अपहरण करून मालेगावात नेत विष पाजून व्यावसायिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 19:00 IST

मालेगाव कॅम्प परिसरात व्यावसायिक हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथून केले अपहरण मालेगावला सापडला मृतदेह

औरंगाबाद : तापडिया कासलीवाल मैदानावर एका प्रदर्शनासाठी आलेल्या केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे नेल्यानंतर तेथे विष पाजून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. १९ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथून हे अपहरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा औरंगाबादेतील क्रांतीचौक पोलिसांकडे वर्ग केला. 

अंशुमन नथू वाघ (४१, रा. मालेगाव कॅम्प, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे.  अंशुमन हा केटरिंगचा व्यवसाय करायचा. तापडिया-कासलीवाल मैदानावर आयोजित प्रदर्शनात त्यांचे स्टॉल होते. हे प्रदर्शन १९ मे रोजी समाप्त झाले. २० मे रोजी सकाळी अंशुमन हा आंघोळ करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे गेला. स्वच्छतागृहाजवळ आंघोळीचे कपडे ठेवून तो आंघोळ न करताच बाहेर पडला. दरम्यान २३ मे रोजी मालेगाव कॅम्प परिसरात तो हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी अंशुमनला रुग्णालयात दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांचा जबाब नोंदविला, तेव्हा त्याने दोन अनोळखींनी एका वाहनातून त्याचे औरंगाबादेतील बसस्थानक येथून अपहरण केले. नंतर काही दिवस त्याला फिरविल्यानंतर त्यांनी हात-पाय बांधून विष पाजल्याचे म्हटले.

या जबाबानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी अंशुमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी  वडनेर खाकुर्डी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. अंशुमनचे अपहरण औरंगाबादेतून झाले असल्याने वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी क्रांतीचौक ठाण्याकडे वर्ग केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राठोड हे तपास करीत आहे. 

सीसीटीव्हीची तपासणीगुन्ह्याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी तपास सुरू केला. तपास पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. शिवाय मृत अंशुमन यांचा मोबाईल २० मे रोजी औरंगाबादेतील त्याच्या प्रदर्शनस्थळीच त्याने ठेवल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली नाही. शिवाय अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी अंशुमनचे अपहरण आणि खून का केला, तसेच मारेकरी कोण आहेत, आदी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी