शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेड्याचा वेदमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:56 IST

विनोद : सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्रदेशी अनेकविध विषयांवर वाद सुरू आहेत. त्यामुळे ‘वादावादीच्या देशा’ असे आपल्या राज्याचे वर्णन करता येईल. प्रादेशिक अस्मितांचे वाद फार टोकदार असतात. आमच्या विचित्र डोक्यामध्ये एक विचार आला. माफ करा, आमच्या डोक्यामध्ये एक विचित्र विचार आला, की ज्या एका गोष्टीवर अद्याप वाद झालेला नाही असा कोणता विषय अद्याप छेडायचा राहिलेला आहे? आणि तो विषय जो आम्हाला सापडला तोच आज आपणासमोर ठेवत आहोत.

- आनंद देशपांडे

संत ज्ञानेश्वर माऊलींनी एका रेड्याच्या तोंडून वेदमंत्र वदवून घेतले हे आपणा सर्वांना विदित आहेच (म्हणजे ‘माहीत’ आहेच, असे नवतरुण वाचकांनी वाचावे. लेखकाला आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी लेखनात असे शब्द वापरावे लागतात. त्याशिवाय इम्प्रेशन पडत नसते. असो.), तर वादाचा मुद्दा असा, की ‘माऊलींनी ज्या रेड्यामुखी वेदमंत्र वदवून घेतले तो रेडा मूळ कुठला असावा’ याविषयी प्रादेशिक वाद निर्माण झाला, तर राज्याच्या विविध भागांमधील विचारवंत आपली, आय मिन आपल्या रेड्याची बाजू कशी मांडतील? हा लेख वाचून झाल्यानंतर आपल्याही डोक्यात असंख्य मुद्दे उपस्थित होतील याविषयी आमच्या मनात संदेह (म्हणजे शंका, पुन्हा तेच) नाही. कोण म्हणतो, विनोदी लिखाण विचार-प्रवर्तक नसते म्हणून? तर अशी असतील विविध प्रदेशांमधील विचारवंत मंडळींची मते- मराठवाडा- माऊली मूळ मराठवाड्यामधील असल्यामुळे त्यांनी प्रादेशिक बुद्धिमत्तेचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्यातील रेड्याची निवड करणे साहजिक आहे. शिवाय विकास झालेला नाही

अन्यथा मराठवाड्यातील रेड्यांची कीर्ती अगदी अमेरिकादी देशांनाही कळाली असती. माऊली द्रष्टे (म्हणजे फोरसाईट असणारे) असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता किंवा आढेवेढे न घेता किंवा उद्दामपणा न करता, मिळेल तो चारा खाणारा आणि सांगेल ते ऐकणारा सहिष्णू रेडा फक्त मराठवाड्यात मिळू शकेल याची त्यांना खात्री असावी. सदर रेड्याने ऐनवेळी काहीही आगाऊपणा न करता आणि माऊलींना चार लोकांपुढे तोंडघशी न पाडता वेदमंत्र म्हणून दाखविले आणि समस्त रेडेजातीची लाज राखली आणि शान वाढविली त्याअर्थी तो रेडा मराठवाड्यातीलच आहे, हे सिद्ध होते.

मराठवाडा ही संतांची भूमी असल्यामुळे येथील रेडे पण काही एक आध्यात्मिक अधिकार बाळगून असतीलच. हे काम महाराष्ट्रातील इतर भागांतील रेड्यांना कधीच शक्य होणार नाही. सबब सदर रेडा मराठवाड्यातीलच होता, अशी अधिसूचना काढून शासनाने या वादावर पडदा टाकावा, अशी मी सूचना करतो.

पुणे- ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेण्यासाठी साहित्यविषयक संवेदना बोथट असलेला रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी का निवडला असावा याचे आकलन होत नाही. शिवाय इथे महिषवर्गीय प्राणीच वापरायचा असेल, तर आपण म्हशींना डावलून समस्त स्त्रीवर्गावर अन्याय करीत आहोत याची पण जाण त्यांनी ठेवलेली दिसत नाही. अर्थात, अल्पवयीन साहित्यिकाकडून आपण काय वेगळी अपेक्षा ठेवू शकतो? असो. तरीही सदरहू रेडा हा पुणे येथीलच असावा, असा अंदाज बांधणे शक्य आहे. याचे दोन पुरावे देता येतील. पुण्यनगरी ही बुद्धिमंतांची खाण आहे. अर्थात, रेडा असो, की येरवाड्याचा वेडा, दोघांनाही मोठे होण्यासाठी पुण्यासच यावे लागते आणि त्याकाळी ज्या पंडितांना हे वेदमंत्र ऐकवायचे असतील ते पुण्यातीलच असणार. कारण तेव्हाही आणि आतासुद्धा पुण्यातील प्रत्येक दुसरी व्यक्ती ही पंडित किंवा विदुषी असते. ज्ञानेश्वरांनी त्यांना नेवासे किंवा इतरत्र बोलावले, तर ते पुणे सोडून कुठेच जाणार नाहीत. सबब त्यांनी सदाशिव पेठेच्या आसपासचा एखादा रेडा गाठून त्याच्याकडून हे काम करवून घेतले असणार. सदरचा रेडा हा पुण्याचा होता हे यावरून सिद्ध होते. शिवाय ज्ञानेश्वरांना पण माहीत नसणारे काही जास्तीचे मंत्र त्याने उच्चारले होते का याविषयी पण संशोधन झाले पाहिजे म्हणजे तो पुण्याचाच होता हे सिद्ध होईल. 

विदर्भ- तो रेडा आमचाच होता हा दावा आम्ही सोडून नाही राहिलो; पण वेगळ्या विदर्भाची आमची मागणी फार जुनी असून, ती मान्य झाल्याशिवाय आमचे रेडे कोणतेच मंत्र म्हणणार नाहीत हे निश्चित. सदरील रेडा एक मंत्र झाला की लगेच ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ असे पालुपद लावीत होता काय याचा जांगडगुत्ता एकदा सोडविल्यास तो आमचा होता काय याविषयी निष्कर्ष काढता येईल.

पश्चिम महाराष्ट्र : अजिबात सिंचन-क्षमता नसणार्‍या मराठवाडा किंवा विदर्भातील कुपोषित रेडे काही म्हणतील हा दावाच हास्यास्पद आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात रेडे भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे सर्व क्षेत्रांत आहेत. कोल्हापूरजवळील राधानगरी अभयारण्यात त्यांचे मोठे भाऊ गवेपण आहेत. आमच्याकडील रेड्यांना मंत्रच काय, बासरी वाजवायला सांगितले तरी सहज वाजवतील. आमची पब्लिक अशा सर्व कलांना किती भरीव हातभार लावते हे आमच्या भागातील असंख्य कलाकेंद्रांना भेटी दिल्यास लगेच लक्षात येईल.आपल्या संसाराची राख झाली तरी चालेल; पण कलावंत उपाशी राहू नयेत, असा सेवाभाव असणार्‍या आमच्या भागातच अशा कलाकार रेड्याची उपज आणि जोपासना होऊ शकते. सदर रेडा आमच्या भागातील आहे हे शासनाने जाहीर केले नाही, तर गाठ आमच्याशी आहे, महाराष्ट्र पेटून उठेल आणि मुख्यमंत्री कुठलाही असला तरी राज्य आमचेच असते हे लक्षात ठेवावे.

मुंबई- इकडे लोकांना मराठी नीट बोलता येत नाही आणि तुम्ही म्हणताय रेड्याने मंत्र म्हटले. भाई वो फुकट में कुछ भी बोला होगा तो समझलो वो हमारा हैच नहीं.

कोकण- खरेतर मी कोणत्याच वादात पडत नाही. कारण त्यावेळी मी तिथे नव्हतो. रेड्याकडून मंत्र वदवून घे, बिना इंधनाची भिंत चालवून दाखव, पाठीवर पराठे भाजून दे, असले आगाऊ उद्योग कोकणी माणूस कधी करीत नाही. दूध देत नसेल तर असला रेडा बाळगून करायचे तरी काय? तो रेडा तुम्हालाच लखलाभ होवो.

( anandg47@gmail.com )