शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत नवीन मालमत्तांना २५%वाढीव कर लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:18 IST

नवीन मालमत्तांना कर लावताना महापालिका प्रशासन चालू आर्थिक वर्षातील प्रचलित दरांचा अवलंब करीत आहे. यामध्ये २५ टक्केवाढ करून कर आकारणी करण्यात यावी. जुन्या मालमत्ता करात एक रुपयाही वाढ करू नये, अशा आशयाचा ठराव ७ फेबु्रवारीच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. अगोदरच शहरातील ४० टक्के मालमत्तांना कर लावण्यात आलेला नाही. त्यात आणखी वाढीव दराने कर आकारणी करायची म्हटले तर नागरिक नकारघंटा वाजवतील, असा सूर या ठरावाच्या निमित्ताने निघत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्रस्ताव : ७ फेबु्रवारी रोजी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन मालमत्तांना कर लावताना महापालिका प्रशासन चालू आर्थिक वर्षातील प्रचलित दरांचा अवलंब करीत आहे. यामध्ये २५ टक्केवाढ करून कर आकारणी करण्यात यावी. जुन्या मालमत्ता करात एक रुपयाही वाढ करू नये, अशा आशयाचा ठराव ७ फेबु्रवारीच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. अगोदरच शहरातील ४० टक्के मालमत्तांना कर लावण्यात आलेला नाही. त्यात आणखी वाढीव दराने कर आकारणी करायची म्हटले तर नागरिक नकारघंटा वाजवतील, असा सूर या ठरावाच्या निमित्ताने निघत आहे.शहरातील ज्या मालमत्तांना अगोदरच कर लावण्यात आला आहे, त्यात एक रुपयाही वाढ करण्यात आलेली नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात असलेले दर कायम ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन मालमत्तांना कर आकारताना २५ टक्के दरवाढ सुचविण्यात आलेली आहे. महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या दरानुसार आज एखाद्या घरास कर लावला तर ४ हजार रुपये मालमत्ता कर आकारला जाईल. मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार आणि वाढीव २५ टक्केदरानुसार ५ हजार रुपये मालमत्ता कर होईल. शहरात आजपर्यंत महापालिकेने फक्त १ लाख ९७ हजार मालमत्तांना कर लावला आहे. वास्तविक पाहता शहरात किमान ३ लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. सव्वालाख मालमत्तांना आजपर्यंत महापालिकेने करच लावलेला नाही. मागील काही वर्षांपासून महापालिकेत नवीन मालमत्ता शोधून कर लावा, अशी ओरड अनेकदा झाली. मात्र, प्रशासनाकडून अंमलबजावणीच होत नाही. कर लावण्यासाठी कर्मचारीच नाहीत, असा सूर प्रशासनाकडून अनेकदा व्यक्त झाला आहे. मागील वर्षी मनपा प्रशासनाने मालमत्ता करात सरसकट २५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे वर्ग केला होता. सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.यंदा प्रशासनाने नवीन मालमत्तांना वाढीव दराने कर लावण्याची शिफारस केली आहे. त्यावर ७ फेबु्रवारी रोजी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.