शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कुलगुरूंच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देविधी मंडळात मागणी : अधिकार गोठवा; आर्थिक गडबडींसह नेमणुकांमध्ये कायदा गुंडाळून ठेवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली.विधानपरिषदेत नियम २०७ अन्वये राज्यातील शिक्षणाविषयी चर्चा झाली. या चर्चेत विद्यापीठातील मागील दोन वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारावर विविध आमदारांनी ताशेरे ओढले. यात बोलताना आ. चव्हाण यांनी बनसारोळा येथील एका अपंग प्राध्यापकाची नियमाप्रमाणे निवड झाली. मात्र ब्लॅकमेल करणारांचे ऐकून कुलगुरूंनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीमध्ये ज्यांनी तक्रारी केल्या अशाच लोकांचा समावेश केला. याप्रकरणी कुलगुरू, राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र काहीच झाले नाही. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये जे प्रभारी अधिष्ठाता नेमले त्यांनी रात्री दहा वाजता बैठक घेऊन नेमणुका केल्या. या अपात्र लोकांनाही पत्रे देण्यात आली. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर नेमणूक केलेल्या एका सदस्याने राजीनामा दिला. ती रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया स्थायी समितीतर्फे करण्यात येते. मात्र कुलगुरूंनी त्याठिकाणी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला नेमणुकीचे पत्र दिले. या नेमणुकीविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी नियमानुसार निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला. कायद्याचे तीनतेरा वाजविण्यात आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही. कुलगुरू अर्थसंकल्पामध्ये स्वत:च्या घरात जीम उभारण्यासाठी २ लाख रुपयांची तरतूद करतात. मागील वर्षीही एवढीच तरतूद केलेली होती. विद्यापीठाचा सर्व कारभार प्रभारींवर सुरू आहे. यामुळे कुलगुरूंची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, ही चौकशी होईपर्यंत कुलगुरूं चे अधिकार गोठवावेत, अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केली. यावर उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे मंगळवारी उत्तर देणार आहेत.गोपीनाथ मुंडे संस्थेला निधी द्याविद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संंशोधन संस्थेला तीन वर्षांपासून राज्य सरकार एक रुपयाही देत नाही. १५० कोटी रुपयांची घोषणाच करण्यात आलेली आहे. विद्यापीठ स्वत:च्या स्थानिक निधीतून ४ कोटी रुपयांची तरतूद करते. सरकारने निधी देण्याची मागणी आ. चव्हाण यांनी केली. राज्यात साडेनऊ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भराव्यात, सीएचबीच्या प्राध्यापकांचे मानधन वाढविणे आदींचा समावेश आहे.कुलगुरूंचा संशोधन घोटाळा धक्कादायककुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या पुणे विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांसोबत संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित केले. याचे बिल मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निधीतून देण्यात आले. याशिवाय १ कोटी रुपयांचे उपकरण ६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा विविध आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणAurangabadऔरंगाबादMLAआमदारDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCorruptionभ्रष्टाचार