शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

माजलगावात मोर्चे

By admin | Updated: August 13, 2014 00:57 IST

माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी

माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी तर राज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत समाजबांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मंगळवारचा दिवस मोर्चाने दणाणून गेला होता.आठवडी बाजारासाठी लढानगर परिषद मनूर रोडवरील सर्व्हे नं. ८ मध्ये बाजार भरविण्यासाठी अडून बसली असून, त्यासाठी विरोध होत आहे. प्रशासनाने याठिकाणी बाजार भरविल्यास बुधवारच्या बाजारावर बहिष्कार टाकून सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे भाई थावरे यांनी दिला आहे.सध्या येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतराचा पश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. गजानन मंदिर रोडवरील बाजार हटविण्यासाठी जगदीश साखरे व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत बाजाराचे स्थलांतर करण्यासाठी एक वर्षापूर्वीच न्यायालयाने नगर परिषद प्रशासनाला सक्तीचे आदेश दिले होते. ७ आॅगस्ट रोजी साखरे व वांडेकर यांनी आत्मदहनचा प्रयत्नही केला होता. तरीसुद्धा बाजारतळाचा पश्न मिटला नाही. न्यायालयाच्या तंबीमुळे नगर परिषद त्यांच्या जागेत सर्व्हे नं. ८ मनूर रोडवर बाजार नेण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता माजलगाव महाविद्यालयाशेजारी सर्व्हे नं. ३०८ मध्ये गायरान जमिनीवर बाजार भरविण्याची शेतकरी, व्यापारी, नागरिकांची मागणी आहे. न.प.ने साफसफाई केली होती. मात्र याठिकाणी बाजार भरविण्यास महाविद्यालय विरोध करीत आहे. महाविद्यालयाशेजारील जागेतच बाजार स्थलांतरीत करावा व ही जागा बाजारासाठी कायमस्वरुपी देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, शेतकरी, नागरिक यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये मनसेचे डॉ. भगवान सरवदे, बाळासाहेब मस्के, श्रीराम जाधव, संजय होके, राधाकृष्ण नायबळ, सलीम आतार यांच्यासह शेतकरी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आरक्षणासाठी बंजारा समाजाचा पारंपरिक वेशभूषेत मोर्चाराज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील बंजारा समाजातील शेकडो महिला, पुरुषांनी एकत्रित येऊन आरक्षणासाठी मोर्चा काढला. दिवसेंदिवस निवडणुका जवळ येत आहेत. निवडणुकांचा अंदाज घेता समाजबांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. संपत चव्हाण, जीवन राठोड, शरद चव्हाण, उदयभान राठोड, मनोज आडे, शाम पवार यांच्यासह महिला, पुरुष, तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चानंतर तहसीलदार अरुण जराड यांना समाजबांधवांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकूणच मंगळवारचा दिवस मोर्चाने गाजला. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. (वार्ताहर)