लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील मगरवाडी येथील दोन मतदान केंद्रांवर निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षिकेंच्या पुढाकारातून आदर्श मतदान केंद्र करण्यात आले आहे. ७४३ मतदार संख्या असलेल्या मगरवाडीत मतदान केंद्र आवारात सडा व रांगोळी काढून परिसर सुशोभित करण्यात आला. त्याचप्रमाणे मतदान जागृती बाबतचे फलक लावण्यात आले.दोन्ही मतदान केंद्रांवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष रूईकर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शंकर बुरांडे, महसूल विभागाच्या नायब तहसीलदार स्मिता बाहेती, यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान सुरळीत पार पडले. मंडळ निरीक्षक एन. आय. शेख, तलाठी डी. डी. साळुंखे यांच्यासह निवडणूक विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी लक्ष ठेवून होते.
मगरवाडीतील मतदान केंद्रावर ‘महिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:46 IST