शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

महावितरण, कम्बाइंड बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:21 IST

एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने एमजीएम अ संघावर, एमजीएम ब संघाने राज्य परिवहन महामंडळावर, तर कम्बाइंड बँकर्सने एमजीएम ब संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज झालेल्या लढतीत दिनेश कुंटे, प्रियांक चोप्रा, शाहेद सिद्दीकी, बाळासाहेब मगर सामनावीर ठरले.

औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने एमजीएम अ संघावर, एमजीएम ब संघाने राज्य परिवहन महामंडळावर, तर कम्बाइंड बँकर्सने एमजीएम ब संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज झालेल्या लढतीत दिनेश कुंटे, प्रियांक चोप्रा, शाहेद सिद्दीकी, बाळासाहेब मगर सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात एमजीएम अ संघ १५ षटकांत ६५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अमित पाठकने एक षटकार व २ चौकारांसह १८, अमरदीप असोलकरने १0 व सागर शेवाळेने १२ धावा केल्या. महावितरण अ कडून शाहेद सिद्दीकीने ६ धावांत ३, पवन सूर्यवंशीने २१ धावांत ३ व ओमप्रकाश बकोरिया यांनी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी लक्ष्य ८ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इनायत अलीने ५ चौकार, एका षटकारासह ३१, रोहित ठाकूरने २४ धावा केल्या. एमजीएम अ कडून अब्दुल शेखने २ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात महावितरण ब ने २0 षटकांत ४ बाद १६0 धावा केल्या. त्यांच्याकडून बाळासाहेब मगरने ४६ चेंडूंत एक षटकार व ७ चौकारांसह ५२, अतिक खानने २ चौकारांसह ३९, संतोष आवळेने ४ चौकारांसह २२ व अनिकेत काळेने १२ धावा केल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन संघाकडून कलीम अहमद व नितीन दुर्वे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात राज्य परिवहन संघ ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सिद्धार्थ थत्तेकरने ३ चौकारांसह २५ व जोगिंदर तुसमकरने १0 धावा केल्या. महावितरण ब कडून पवन सरोवरने २२ धावांत ३, तर संजय बनकर व कुमार नायडू यांनी प्रत्येकी २ आणि बाळासाहेब मगरने १ गडी बाद केला.तिसºया सामन्यात कम्बाइंड बँकर्स अ संघाने ४ बाद १६२ धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश कुंटेने ३ चौकारांसह नाबाद ४४, सय्यद जावेदने २ षटकार व एका चौकारासह २८, रवींद्र शेरेने २४ व मिलिंद पाटीलने १९ धावांचे योगदान दिले. एमजीएम अ कडून रवींद्र काळे, शेखर ताठे, सय्यद फरहान, सय्यद सैफउद्दीन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमजीएम ब संघ १४५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शेखर ताठेने एकाकी झुंज देत ४३ धावा केल्या. सय्यद फरहानने २८, प्रमोद राऊतने २७, लक्ष्मण सूर्यवंशीने २४ धावा केल्या. कम्बाइंड बँकर्सकडून दिनेश कुंटेने ३६ धावांत ४, तर सय्यद जावेदने ३ गडी बाद केले. मिलिंद पाटील व विरल शाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पंच म्हणून उदय बक्षी, महेश जहागीरदार, राजा चांदेकर, आर. नेहरी यांनी काम पाहिले.