शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, श्रेयस संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:11 IST

एमजीएम क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या एमजीएम टी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण संघाने लीप फास्टनर संघाचा पराभव केला. दुसºया सामन्यात श्रेयस इलेव्हन संघाने बार्शी येथील एमसीसी संघावर विजय मिळवला. इनायत अली आणि माजीद खान आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

ठळक मुद्देसामनावीर : इनायत अली, माजीद खान चमकले

औरंगाबाद : एमजीएम क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरूअसलेल्या एमजीएम टी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण संघाने लीप फास्टनर संघाचा पराभव केला. दुसºया सामन्यात श्रेयस इलेव्हन संघाने बार्शी येथील एमसीसी संघावर विजय मिळवला. इनायत अली आणि माजीद खान आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात महावितरण संघाने २0 षटकांत २ बाद १४३ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून इनायत अली याने ३ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ६७ व सचिन लव्हेरा याने २५ चेंडूंत ४0 धावांची झटपट खेळी केली. लीप फास्टनर संघाकडून राजू मदन व विक्रम चौधरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात लीप फास्टनर संघ ३ बाद १२६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून राजू मदन याने एकाकी झुंज देत नाबाद ६३ व राहुल पाटीलने ३५ धावा केल्या. महावितरणकडून हरमितसिंग रागी, इनायत अली व भास्कर विजय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात बार्शी येथील एमसीसी संघ ३0 धावांत ढेपाळला. श्रेयस इलेव्हन संघाकडून माजीद खान याने ६ धावांत ६ गडी बाद केले. मुस्तफा शहा याने १ धावेत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रेयस इलेव्हनने विजयी लक्ष्य ३.३ षटकांत १ गडी गमावत ३३ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून युसूफ पठाण नाबाद २४ धावा केल्या. उद्या सकाळी एमजीएम विरुद्ध नेरळकर अकॅडमी आणि दुपारी एमसीसी बार्शी वि. यंग इलेव्हन अ यांच्यात सामने होणार असल्याचे एमजीएमतर्फे सागर शेवाळे यांनी कळवले आहे.