शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, कम्बाईन बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:45 IST

एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देइनायत अली, महेंद्रसिंग कानसा, इंद्रजित उढाण सामनावीर

औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात महावितरण अ संघाविरुद्ध मनपा संघाने ११३ धावा केल्या. त्यांच्याकडून विशाल गवळी याने २९, प्रवीण क्षीरसागरने १८ व सचिन लव्हेराने १७ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अलीने १६ धावांत ३ गडी बाद केले. ओम प्रकाश बकोरिया यांनी २, तर राहुल परदेशी, स्वप्नील चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी लक्ष्य १७.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून राहुल शर्माने ७ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. पवन सूर्यवंशीने २१, स्वप्नील चव्हाणने १९ व इनायत अलीने ११ धावा केल्या. मनपाकडून कवरसिंग चव्हाणने २ व प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात बडवे इंजिनिअरिंगने ८ बाद १५० धावा केल्या. त्यांच्याकडून इंद्रजित उढाणने ८ चौकारांसह ४६, वीरल पटेलने २७, ज्योतिबा विभुतेने १७ व जावेद शेखने २० धावा केल्या. डी. आर. ए. जी. ई. ओ.कडून हर्षवर्धन काळेने ३० धावांत ३, संतोष राऊतने २ आणि संदीप शिंदे व रोहित गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात डी. आय. ए. जी. ई. ओ. ९ बाद १३४ धावाच करू शकला. त्यांच्याकडून संतोष राऊतने ३२ व गौरव सपकाळने २८ धावा केल्या. बडवे इंजिनिअरिंगकडून ज्ञानेश्वर भुरंगे व शेख जावेद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. राहुल पाटील व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तिसºया सामन्यात जावेद शेख याने कम्बाईन बँकर्सने ५ बाद १९३ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून जावेद शेखने ३१ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ६१, मिलिंद पाटीलने २३ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५४ व दिनेश कुंटेने ४२ धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील कनिष्ठ संघाकडून शेख हनीफने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ ९५ धावांत सर्वबाद झाला. कम्बाईन बँकर्सतर्फे अनुभवी महेंद्रसिंग कानसाने १० धावांत ५ गडी बाद केले. नवनाथ वरकड व हिरल शाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.रविवार, २५ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता इंडोजर्मन टूलरूम वि. आॅटो स्कोडा, १०.३० वा. शहर पोलीस ब वि. आयुर्विमा, दु. २.१५ वा. मसिआ वि. वैद्यकीय प्रतिनिधी या संघात सामने होणार आहेत.