शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:39 IST

उद्धवसेना, राष्ट्रवादी-शप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चर्चा

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी संबंधाने जो काही निर्णय होईल, तो शनिवारी (दि. २७) जाहीर करण्यात येईल, असे शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी सांगितले.

काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी ते मुंबईला गेले आहेत. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीशी पाच-सहा जागांवर आमची बोलणी थांबली आहे. उद्धवसेनेबरोबरही काही जागांवर बोलणी थांबली आहे. उद्या ती पूर्ण करून अंतिम निर्णय घेणार आहे.

मुंबईतल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही उद्धवसेना आणि मनसे एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवणार असेल तर मग उद्धवसेनेबरोबर आमची बोलणी होणार नाही, असेही शेख युसुफ यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी (शरद पवार) चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना पक्षनेते शरद पवार यांनी तातडीने पुण्याला बोलावून घेतल्यामुळे ते गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येऊ शकले नाहीत. ते शुक्रवारी (दि. २६) येणार आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार) ची व उद्धवसेनेची काल सायंकाळी जागावाटपावर चर्चा झाली. उर्वरित चर्चा पुन्हा होणार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) ला वीस जागा मिळाल्या तरी आम्ही समाधानी राहू, असे या राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहराध्यक्ष ख्वाजाभाई शरफोद्दीन यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi decision for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation tomorrow.

Web Summary : The Maha Vikas Aghadi's decision regarding the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation election will be announced tomorrow. Congress, Shiv Sena (UBT), and NCP are finalizing seat-sharing talks. Uncertainty remains regarding potential Shiv Sena (UBT) and MNS alliance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीChhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६