शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महावंदनेस लोटला जनसागर

By admin | Updated: April 15, 2016 01:46 IST

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून परभणीत महावंदनेचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून परभणीत महावंदनेचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाभरातील विविध जयंती समित्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुमारे ५० हजार अनुयायांच्या उपस्थितीत महावंदना घेण्यात आली. या महावंदनेनंतर महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम पार पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्यानिमित्ताने परभणीत महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. विविध जयंती मंडळांकडून जयंती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच परभणीत सुकाणू समितीची स्थापना करुन सामूहिक महावंदना घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात शुभ्रवस्त्र परिधान करुन अनुयायांची गर्दी होत होती. सकाळी ८ ही महावंदनेची वेळ देण्यात आली होती. निश्चित केलेल्या वेळेनुसार महावंदनेला सुरुवात झाली. प्रारंभी भदंत उपगुप्त महास्थवीर, भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत कश्यप, भदंत मुदितानंद यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. महास्थवीर यांनी उपस्थितांना बुद्ध, धम्म, संघ सामूहिक वंदना दिली. महावंदनेनंतर त्रिसरण, पंचशील आणि भीमगाथा पार पडली. महावंदनेच्या समारोपीय भागात सामूहिक संकल्प घेण्यात आला. त्यात धम्माने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. परभणीत महावंदनेच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवर महावंदनेसाठी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील दोन्ही रस्त्यांच्या बाजुने मिळेल त्या ठिकाणी बसून, उभे टाकून नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात महिला व पुरुष शुभ्रवस्त्र परिधान करुन सहभागी झाले होते. मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी खा. बंडू जाधव, आ.राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, आनंद भरोसे, विजय वाकोडे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, डॉ. प्रकाश डाके, भीमराव हत्तीअंबिरे, बी.एच.सहजराव, भीमराव खाडे, डॉ.भगवान धूतमल, अरुणकुमार लेमाडे, डॉ.सुरेश शेळके, डॉ. परमेश्वर साळवे, राजकुमार मनवर, भीमराव शिंगाडे, रवि सोनकांबळे, डॉ. अशोक जोंधळे, अ‍ॅड.रवि गायकवाड, डी.एन. दाभाडे, प्राचार्य सुरेश सदावर्ते, सुधीर साळवे, विजय गायकवाड, संजय सारणीकर, सिद्धार्थ भराडे, गौतम मुंडे, नगरसेवक सचिन देशमुख, टी.टी.कांबळे, द्वारकाबाई गंडले, राणूबाई वायवळ, शांताबाई जोगदंड, मनिषा ढवळे, शीलाताई कागदे, कमलताई उबाळे, आशाताई मालसमिंदर, रणजीत मकरंद, प्रा.सुनील तुरुकमाने, पंकज खेडकर, मिलिंद बामणीकर, नागेश सोनपसारे, भीमराव वायवळ, सुशील कांबळे, कैलास गायकवाड, आकाश लहाने, अतुल सरोदे, यशवंत मकरंद, डॉ. सुनील अहिरराव, भीमप्रकाश गायकवाड, किरण मानवतकर, रवि पंडित आदींची उपस्थिती होती.