शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन कबड्डीला आॅलिम्पिकमध्ये हवी संधी

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

महेश पाळणे, लातूर राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़

महेश पाळणे, लातूरराम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़ प्रतिस्पर्धी संघातील भिडूला सूर मारून स्पर्श करीत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मध्यरेषा गाठताना कबड्डी कबड्डी कबड्डी म्हणण्याचा उच्चार टिकवून ठेवणारा हा दमदार खेऴ या कबड्डी खेळाचा उगम रांगड्या महाराष्ट्राच्या लालमातीत झाला़ जागतिक पातळीवर हा खेळ आजमीतीला मातीवरून मॅटवर गेला आहे़ प्रतिवर्षी १५ जुलै हा कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो़ प्राचीन काळात वेगवेगळ्या नावाने कबड्डी खेळ परिचीत होता़ शब्दाच्या उच्चाराने फुफ्फुस बळकट होत असल्याने मुकी कबड्डी बोलकी झाली़ राज्यातील जनता निरोगी असावी व अंगी चपळता यावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्याकाळात कबड्डीला सुरूवात केली़ पूर्वी हा खेळ हूतूतू या नावाने ओळखला जात असे़ कबड्डी जरी प्राचीन असली तरी महाराष्ट्रात तिचा जन्म १९२१ साली झाला़ आधुनिक कबड्डीला १९३० साली भारतात सुरूवात झाली़ महाराष्ट्रात सुरूवातीस अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कबड्डीस चालना दिली़ दयानंद क्रीडा मंडळ, अंधोरी़ स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद़ प्रभात क्रीडा मंडळ, रेणापूऱ जय हिंद क्रीडा मंडळ, रोकडा सावरगाव यासह आनंदवाडी, हिंपळनेर, कवठाळी व चापोलीतील कबड्डीपटूंनी लातूरचे नाव राज्यभर पोेहोचविले. चंद्रकांत पाटील, प्राग़णपतराव माने, धर्मपाल गायकवाड, श्रीरंग बंडापल्ले यांना कबड्डीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे़ विनोद लखनगीरे, भास्कर सुर्यवंशी, बाबुराव नलवाड, तुळशिराम रोकडे, अशोक जाधव, सुरेखा जगताप, खतीजा शेख, भाग्यश्री सुर्यवंशी, साजीदा शेख यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली चुणूक दाखवीली आहे़ लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद, अंधोरी, रेणापूर, किनगाव व रोकडा सावरगाव येथे कबड्डीच्या राज्य ते अखिल भारतीय स्तरा पर्यंतच्या स्पर्धा घेण्यात आल्या़आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा़़़मराठमोळ्या कबड्डीचा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा, गावोगावी कबड्डी वाढली पाहिजे़ जिल्ह्यासह मराठवाड्यात कबड्डीचा स्तर उंचायला हवा यासह कबड्डीतील तांत्रीक बाबींचा अभ्यास करत खेळाडूंना कौशल्य शिकवीणे गरजेचे असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राग़णपतराव माने यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.