शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता जाधवच्या शतकी तडाख्याने महाराष्ट्र विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:13 IST

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय सीनिअर क्रिकेटपटू श्वेता जाधव हिच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या सीनिअर महिलांच्या वनडे साखळी क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर २१ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

ठळक मुद्देसीनिअर महिला क्रिकेट स्पर्धा : बलाढ्य मुंबईवर २१ धावांनी मात

औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय सीनिअर क्रिकेटपटू श्वेता जाधव हिच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या सीनिअर महिलांच्या वनडे साखळी क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर २१ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.श्वेता जाधव हिने चौफेर टोलेबाजी करीत ९६ चेंडूंत १२ सणसणीत चौकार व एका टोलेजंग षटकारासह केलेल्या १०१ धावांच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राने ४९.५ षटकांत २१९ धावा फटकावल्या. आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतत असताना डावखुरी शैलीदार फलंदाज श्वेता जाधव हिने शिवाली शिंदे हिच्या सथीने दुसºया गड्यासाठी ७३ आणि औरंगाबादची अष्टपैलू खेळाडू प्रियंका गारखेडे हिच्या साथीने आठव्या गड्यासाठी ६८ धावांची झुंजार भागीदारी करीत महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. प्रियंका गारखेडे हिने ६९ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ आणि शिवाली शिंदे हिने ३ चौकारांसह ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून फातिमा जाफर व वृषाली भगत यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. पी. नाईक हिने २ बळी घेतले.प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ४८.५ षटकांत १९८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून श्वेता हरनहाली हिने ७ चौकारांसह ५५, एच. काझी हिने ३० धावा केल्या. महाराष्ट्राकडून उत्कर्षा पवार हिने ३२ धावांत ३ गडी बाद केले. कविता पाटील, माया सोनवणे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. शतकवीर श्वेता जाधव हिला कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल एमसीएच्या सीनिअर निवड समितीचे चेअरमन यांनी महाराष्ट्र संघाचे तसेच शतकवीर श्वेता जाधव हिचे अभिनंदन केले आहे.