शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

लोकसहभागातून महाराष्ट्र पाणीदार होईल

By admin | Updated: May 19, 2015 00:49 IST

लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़

लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़ त्यासाठी मेहनत व पैसा खर्च करण्याची गरज आहे़ राज्यस्थानने गेल्या ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ त्यामुळे तेथील दुष्काळ संपुष्टात आला आहे़ दुष्काळमुक्त व पाणीदार होण्यासाठी सामुहीक मेहनत करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले़जलयुक्त शिवार अभियानातील कामाची पाहणी सोमवारी लातूर जिल्ह्यात त्यांनी केली़ या पाहणीदरम्यान अहमदपूर तालुक्यातील परचंडा, बामणी, शिवणी, उमरदरा, सावरगाव येथे नाला खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ झाला़ तसेच लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ़ राजेंंद्रसिंह यांनी टंचाईमुक्तीचा कानमंत्र दिला़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी स्वाती शिंदे, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, पंचायत समिती सभापती आऱ डी़ शेळके, जि़ प़ सदस्य चंद्रकांत मद्दे, एऩआऱ पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, विठ्ठलराव बोडके आदींची उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, लोकप्रतिनिधी, जनता आणि शासन या तिघांनी एकत्र येऊन काम केल्यास जलसंकटाचा सामना करता येणार आहे़ राज्यकर्ते, समाज व संतांनी आपापल्या भूमिका प्रमाणिकपणे पार पाडल्या तर देशातला दुष्काळ नाहीसा होईल़ राजस्थानपेक्षा महाराष्ट्र राज्य सुधारीत आहे़ राजस्थानमध्ये ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ यामुळे सरकारी मदत न घेता तेथील दुष्काळ नाहीसा झाला़ पाण्याचे संकट मोठे आहे़ या संकटाशी लढायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे़ लोकसहभागाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होऊ शकणार नाही़ लोकांनी आता राजकारण्यांच्या मागे न धावता ढगांच्या मागे धावले पाहिजे़ तरच दुष्काळ नाहीसा होईल़ पाणीटंचाई किंवा दुष्काळ घालवायचा असेल तर आमदार, खासदारांच्या हातात हात घालून नव्हे, तर ग्रामस्थांच्या हातात हात घालून कामे करावी लागतील़ राजस्थानचा विकास तेथील शेतकऱ्यांनी केला़ वाहते पाणी जमीनित आडवून व जिरवून पाणीपातळीत वाढ केली़ आपल्याला हे का शक्य नाही, असा सवाल उपस्थित करुन डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, जलवायु परिणामामुळे दुष्काळ पडत आहे़ पावसाचे चक्र बदलले आहे़ सूर्याच्या उष्णतेने वर्षभरात ३ मीटर पाण्याची वाफ होते व पावसाच्या पाण्यामुळे दीड फुट पाणीपातळीत घट होते़ पाणी अडविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)