औरंगाबाद : गुजरातमधील नाडियाद येथे आज संपलेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र व मुंबई लढत अनिर्णीत राहिली. या लढतीत बीडच्या सचिन धसने गोलंदाजीत, तर सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने फलंदाजीत विशेष ठसा उमटवला.मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३५0 धावा केल्या. त्यांच्याकडून सलामीवीर वेदांत गादिया याने २५८ चेंडूंत २८ चौकारांसह १६२ व मोहित तन्वर याने १३४ चेंडूंत १८ चौकारांसह १00 धावा केल्या. महाराष्ट्राकडून तिलक जाधव याने २४ धावांत ४ गडी बाद केले. त्याला उपकर्णधारपद भूषवणाºया बीडच्या सचिन धस याने ७९ धावांत ४ गडी बाद करीत सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने सर्वबाद ३३१ धावा केल्या. त्यांच्याकडून सलामीवीर अर्षिन कुलकर्णीने २२१ चेंडूंत २४ चौकार व एका षटकारांसह १३५ धावांची खेळी केली. तिलक जाधवने ८ चौकारांसह ५0, ए. काझीने ३५, ओमकार राजपूतने २७, सचिन धसने २४ व आदिनाथ प्रभाळकरने २२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून जुगराज मेहता याने ५३ धावांत ५ गडी बाद केले. पहिल्या डावात १९ धावांची आघाडी घेणाºया मुंबईने दुसºया डावात ५ बाद २५५ धावा केल्या. त्यांच्याकडून आयुष जेठवा याने १0७ चेंडूंत १९ चौकारांसह १0५ धावा केल्या. महराष्ट्राकडून सचिन धस व ए. काझी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमुंबई : पहिला डाव : ३५0. (वेदांत गादिया १६२, मोहित तन्वर १00. सचिन धस ४/७९, तिलक जाधव ४/२४). दुसरा डाव : ५ बाद २५५. (आयुष जेठवा १0५, वेदात गादिया ४१. सचिन धस २/६३, ए. काझी २/३१).
महाराष्ट्र-मुंबई लढत अनिर्णीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:49 IST