शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 7:34 PM

१४ उमेदवार रिंगणात 

ठळक मुद्देतब्बल नऊ उमेदवारांची माघार

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, अशी थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीही निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जैस्वाल यांचा विजय मोकळा झाला, असा दावा युतीकडून करण्यात येत आहे. २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमने जैस्वाल यांच्याकडूनच हिसकावून घेतला होता. यंदा विजयाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी पक्षाने जोरदार कंबर कसली आहे. एमआयएमचे बंडखोर जावेद कुरैशी यांनीही तलवार म्यान केली. त्यामुळे विजय हमखास आपलाच, असा दावा एमआयएमकडून होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही चांगलेच आव्हान उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमित भुईगळ यांनी आपल्या पारंपरिक मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. नगरसेविका कीर्ती शिंदे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अ‍ॅड. अभय टाकसाळ, नगरसेवक चेतन कांबळे, बसपाचे नाना म्हस्के, असे एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

एमआयएमच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला परत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. सेना उमेदवाराचा थेट मुकाबला एमआयएमशी होणार हे निश्चित असले तरी राष्ट्रवादीचे कदीर मौलाना व वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांची जादू मतदारावर किती चालते यावर विजयाचे गणित आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे १२ दिवसांचा कालावधी आहे. प्रचारात आघाडी घेण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार प्रयत्न करणार आहेत.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- जुन्या शहरात पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. बाजारपेठेत पार्किंगची सुविधा कुठेच नाही. मुख्य रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा. जिकडेतिकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळतील. ४० वर्षांपासून रस्ते जशास तसे आहेत. विकास आराखड्यानुसार रुंदीकरण झालेच नाही. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी.- मतदारसंघात महिला, पुरुष  शौचालयांचा प्रचंड अभाव असल्याने बाजारपठेत येणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुचाकी उभी करताच पोलीस उचलून नेतात.- मतदारसंघात जगप्रसिद्ध मकबरा, पाणचक्कीचा समावेश असल्याने लाखो पर्यटक शहरात येतात. पर्यटकांना कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. घाटी रुग्णालय वगळता आरोग्यसेवा मजबूत नाही. सिमेंटचे जंगल वाढत असताना उद्याने गायब होऊ लागली. नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे.

उमेदवारांच्या जमेच्या बाजू प्रदीप जैस्वाल (शिवसेना)- रात्री-अपरात्री कोणाच्याही मदतीला धावून जाणारा नेता.- पक्षभेद विसरून विविध जाती-धर्मांच्या नागरिकांशी  सलोखा.- पदाची पर्वा न करता चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय.- सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता अशी ओळख.

नासेर सिद्दीकी (एमआयएम)- २०१५ मध्ये पहिल्यांदाच एमआयएमच्या तिकिटावर नगरसेवक झाले.- साडेचार वर्षे महापालिकेत गटनेता म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी.- विकासकामांचे चांगले व्हिजन.- संघटन कौशल्यासह वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास.

कदीर मौलाना (राष्ट्रवादी)- महापालिकेत पाच वर्षे  नगरसेवक म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी.- २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविल्याचा अनुभव.- पक्षात राज्य पातळीवर काम केल्याचा दांडगा अनुभव आहे.- नागरिकांच्या समस्यांची जाणीव.

अमित भुईगळ (वंबआ)- महापालिकेत पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम केले.- प्रकाश आंबेडकर यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख.- राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग.- भारिपमध्ये काम केल्याचा दांडगा अनुभव पाठीशी.- निवडणूक लढण्याची चांगली कसब.

2०14 चे चित्र :इम्तियाज जलील (एमआयएम-विजयी)  प्रदीप जैस्वाल          (शिवसेना-पराभूत)

 

टॅग्स :aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019