शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:03 IST

व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आल्या.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत १२८ उमेदवारांच्या भवितव्याचा मतदार राजाने दिलेला कौल सोमवारी ईव्हीएममध्ये कैद झाला. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होऊन ६ वाजता पूर्ण झाले. जिल्ह्याची मतदानाची अंदाजित टक्केवारी 65.45 % असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

एकूण  अंदाजित अपेक्षित टक्केवारी104- सिल्लोड-73.01%105- कन्नड- 69.24 %106- फुलंब्री- 70.15%107- औरंगाबाद मध्य- 60.12 %108- औरंगाबाद पश्चिम- 61.32%109- औरंगाबाद पूर्व- 61.75 %110- पैठण- 71.03 %111- गंगापूर-  61.18 %112- वैजापूर- 61.77 %

जिल्ह्याची एकूण अंदाजित टक्केवारी- 65.45 %

१३ हजार कर्मचारी होते कार्यरत सर्व केंद्रांवर १३ हजार ३०६ अधिकारी, कर्मचारी असतील, तर ३३९ क्षेत्रीय अधिकारी आहेत. १४४ मतमोजणी अधीक्षक, २७९ आणि सूक्ष्म निरीक्षक १४४ अशा प्रकारे ५६७ मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते.

कडेकोट बंदोबस्तशहर आयुक्तालयांतर्गत ३,५०० स्थानिक पोलीस, ३५० होमगार्डस्, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तीन तुकड्या, तसेच राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आल्या होत्या. स्ट्रायकिंग फोर्सची २० पथके, तर ग्रामीणमध्ये स्थानिक १,८०० पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

3024 मतदान केंद्रे जिल्ह्यात नऊ मतदारसंघ असून, सर्व मिळून ३०२४ मतदान केंद्रे जिल्ह्यात आहेत.  यामध्ये सहायकारी ६७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

मतदानासाठी ४२४० व्हीव्हीपॅटविधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी  प्रथमच ४ हजार २४० व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर करण्यात आला. याद्वारे मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती दिसेल. त्यावर चिन्ह, नाव व उमेदवार अनुक्रमांक असेल. त्यामुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री होणे शक्य आहे. 

ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था? प्रशासनाने मतदान केंद्रावर बॅलेट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.  ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास राखीव यंत्राची व्यवस्था आहे. यामध्ये १५८ व्हीव्हीपॅट, २५० कंट्रोल युनिट, तर ३४२ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 

किती उमेदवार?मतदारसंघ    उमेदवार     मतदारसिल्लोड    ७    ३१६९३८        कन्नड    ८        ३१४२२२     फुलंब्री    १३    ३२५४९१        औरंगाबाद मध्य    ९    ३२४६६२ औरंगाबाद पश्चिम     १२    ३३५०५९        औरंगाबाद पूर्व    ३४    ३१७९५८        पैठण    १५    २९३५९९     गंगापूर    १४    ३१२४०६     वैजापूर     १६    ३०९४२०        एकूण     १२८    २८४९७५५ 

जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनातून ईव्हीएम पोहोचविणार मतदानानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर नेण्याची व आणण्याची व्यवस्था केली आहे. व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेल्या जातील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमpaithan-acपैठणvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरkannad-acकन्नडsillod-acसिल्लोडphulambri-acफुलंब्री