शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:25 IST

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आदर्श आचारसंहिता पथक प्रमुखाने दिली तक्रार

ठळक मुद्देभाषणादरम्यान आदर्श आचारसंहिता भंग होईल, असे वक्तव्य केले.

औरंगाबाद/पिशोर : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन रायभान जाधव यांच्याविरुद्ध गुरुवारी (दि.१७) पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला . आदर्श आचारसंहिता पथकप्रमुख राजमहेंद्र डोंगरदिवे यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव यांच्या अश्लाघ्य वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी  तणाव निर्माण होऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. राजमहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  १४ आॅक्टोबर रोजी सोमवारी करंजखेडा येथील सभेत जाधव यांनी भाषणादरम्यान आदर्श आचारसंहिता भंग होईल, असे वक्तव्य केले. यावरून पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ व अश्लाघ्य भाषेत टीका करताना जाधव यांनी मातृत्वाचाच अपमान केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच  कार्यकर्त्यांनी पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, सिडको, क्रांतीचौक, सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर जाधव यांच्या शहरातील घरावर व कारवर दगडफेक झाल्याची कथीत घटनाही घडली. 

मी ठाकरे कुटुंबाबाबत बोललोच नाहीदगडफेक समोरासमोर येऊन करा, मग बघू काय व्हायचे ते. मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, त्यांच्या आईबाबत काहीही बोललो नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना बोललो आहे. हवे तर रेकॉर्डिंग तपासून पहा. माझ्या नावाने खापर फोडणारे शिवसैनिक, म्हणजे चंद्रकांत खैरे आहेत.

जाधव यांची ही स्टंटबाजी - दानवेशिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे म्हणाले, हर्षवर्धन जाधव यांनी स्टंटबाजी केली. सहानुभूती मिळण्यासाठीच त्यांनी स्वत:च हल्ल्याचा स्टंट केला आहे. ते जरी म्हणत असतील की, मी ठाकरे कुटुंबाबाबत वक्तव्य केले नाहीत. परंतु रेकॉर्डिंगमध्ये सगळे काही दिसते व ऐकू येते आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी. आम्हीही त्यांच्या कुटुंबाबाबत बोललो असतो, परंतु आमची ती संस्कृती नाही. खैरेंशी त्यांचे भांडण आहे, तर मग त्यांनी खैरेंवर बोलावे. शिवसेनेने ऐकून घेतले, याचा अर्थ शिवसेना गप्प बसली आहे, असा होत नाही. 

हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्यावर दगडफेककन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर, श्रीराम कॉलनीतील बंगल्याच्या आवारात उभ्या कारच्या काचा अज्ञातांनी दगडफेक करून फोडल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास घडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा उद्दामपणा असल्याचा आरोप जाधव यांनी केला. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकाने तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kannad-acकन्नडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव