शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान : कन्हैयाकुमार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:47 IST

नकारात्मक राजकारणाची भडकलेली आग विझवा

ठळक मुद्देताकद लोकसंख्येवरून मोजली जात नाही. वैचारिक पातळीवर ती अवलंबून असते. नेमके निवडणुकीतच कसे अस्मितेचे, भावनेचे प्रश्न निर्माण केले जातात

औरंगाबाद : ‘निवडणूक ही एक संधी आहे. मंदिर, मशीद, हिंदू- मुस्लिम असा  वादाचा हा मुद्दा नाही. दिवसेंदिवस नकारात्मकतेची आग वाढत चालली आहे. ती आग या निवडणुकीच्या माध्यमातून बुजवा’ असे आवाहन आज येथे पुरोगामी विचारांचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. ते आमखास मैदानावर भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

भाकपची ताकद किती असा सवाल विचारणाऱ्यांचा त्यांनी समाचार  घेतला. ते म्हणाले, ताकद लोकसंख्येवरून मोजली जात नाही. वैचारिक पातळीवर ती अवलंबून असते. भाकपची ताकद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील (टाळ्या) ३५ जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे. निवडून येईल न येईल; पण या मुद्यांसाठी माझी रस्त्यावरची लढाई चालूच राहील, अशी ग्वाही यावेळी उमेदवार टाकसाळ यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.

या सभेत एस. जी. शुत्तारी, कॉ. भगवान भोजने, अ‍ॅड. जनार्दन भोवते, साथी सुभाष लोमटे, कॉ. अश्फाक सलामी, आसाराम लहाने पाटील, कॉ. बुद्धप्रिय कबीर आदींची भाषणे झाली. कॉ. भास्कर लहाने यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी कॉ. राम बाहेती यांनी आभार मानले. मंचावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ, अण्णा खंदारे, कॉ. पंडित मुंढे यांच्यासह नेते इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेपूर्वी कन्हैयाकुमार रॅलीने सभास्थानी आले.

भगतसिंगांचा अपमानस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान होय. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि देशासाठी भगतसिंग फासावर गेले होते. दोघे एकाच तराजूत तोलले जाऊ शकत नाहीत, असा टोला कन्हैयाकुमार यांनी लगावला.नेमके निवडणुकीतच कसे अस्मितेचे, भावनेचे प्रश्न निर्माण केले जातात, याचे हे उदाहरण होय, असेही ते म्हणाले. रॅलीत सावरकर चौक लागले. तिथे खड्डेच खड्डे. हे साधे खड्डे न बुजवू शकत नाहीत. अन् सावरकरांना भारतरत्न देऊ म्हणताच हंशा नि टाळ्या झाल्या. 

मग निवडणूक घ्यायची काय गरज?  महाराष्टÑात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत, असा प्रचार सुरू आहे, असे असेल, तर मग निवडणूकच घ्यायची काय गरज? निवडणूक न घेतल्याने तेवढा खर्च तरी वाचेल ना? लोकशाहीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार लोक ठरवत असतात; पण प्रचारतंत्र असे वापरले जात आहे की, खोटेही खरे वाटावे. निवडणुकीत तुम्ही जीवनमरणाचे प्रश्नच विसरावेत, असा प्रयत्न होत आहे, असे परखड मत कन्हैयाकुमार यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यkanhaiya kumarकन्हैय्या कुमार