शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:02 IST

Maharashtra Election 2019 : ६ ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना

ठळक मुद्देसरासरी ६० टक्के मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मतदारसंघातील ३२४ पैकी सहा मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बंद पडण्याच्या घटना घटल्या. त्यामुळे अर्धा तास मतदारांना वाट पाहावी लागली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह पाहायला मिळाला. दुपारी १ वाजेनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. हर्सूल गावातील कोलठाणवाडी रोडवरील एकनाथ विद्यामंदिरात मतदान केंद्र होते. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला. तब्बल एक किलोमीटर चिखल तुडवत मतदारांना ये-जा करावी लागत होती, तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. हर्सूलमधील मनपाच्या शाळेतील चारही केंद्रांवर लांबचलांब रागा होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले होते.

मध्य मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील चार आणि टप्पा क्रमांक तीनमधील इमारतीतील चार अशा आठ मतदान केंद्रांवर दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते. मध्य मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. नवीन व्हिलचेअरमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन जात होते. शहरातील विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी थोड्या थोड्या वेळाने पोलिसांकडे प्राप्त होत्या. आमखास मैदानावरील सिटी क्लब येथील मतदान केंद्रावर अर्धा तास याच वादावरून मतदान थांबविण्यात आले होते.

सखी मतदान केंद्र मध्य मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्रे होती. एम.पी. लॉ कॉलेज आणि छावणीतील पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. एमपी लॉ कॉलेजमध्ये सखी मतदान केंद्रावर दुपारी ४ वाजेपर्यंत ८९१ मतदारांपैकी ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

औरंगाबाद मध्यमध्ये असा वाढला मतदानाचा टक्कासकाळी ७ ते ९ वाजता    :    ६.४८ टक्केसकाळी ९ ते ११ वाजता    :    १७.५८  टक्केदुपारी ११ ते १ वाजता    :    ३१.१५ टक्के दुपारी १ ते ३ वाजता    :    ४३.२२ टक्के सायंकाळी ३ ते ५ वाजता    :    ५४.८७ टक्के सायंकाळी ५ ते ६ वाजता    :    ५९.५० टक्के 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यVotingमतदान