शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
5
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
7
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
8
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
9
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
10
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
11
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
12
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
13
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
14
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
15
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
16
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
17
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
18
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
19
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
20
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

वैजापूर विधानसभा मतदारसंघात वाढले दोन हजार ५२ मतदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:45 IST

उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

ठळक मुद्देअंतिम मतदार यादी प्रसिद्ध राजकीय वातावरण तापले

वैजापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी जाहीर करण्यात आली असून, तत्पूर्वीच प्रशासनाने ३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार वैजापूर तालुक्यात ३ लाख ९ हजार ४२० मतदार असून, त्यात वैजापूर तालुक्यातील १६५ आणि गंगापूर तालुक्यातील ४१ गावांचा समावेश आहे. यंदा २ हजार ५२ मतदार वाढले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी वैजापूर तालुक्यात एकूण ३ लाख ७ हजार ३६८ मतदार होते. तर ३१ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार तालुक्यात सध्या ३ लाख ९ हजार ४२० मतदार असल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या वेळची मतदार यादी व नुकतीच प्रसिद्ध झालेली मतदारांची तुलना केल्यावर २ हजार ५२ मतदार वाढल्याचे दिसून येते.  तालुक्यातील मतदारांचे नाव नोंदविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय आक्षेपही मागविण्यात आले. त्यानंतर मतदार यादीत दुरुस्ती करून ती ३१ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात आली. सदर मतदार यादीनुसार वैजापूर विधानसभा मतदार क्षेत्रात १ लाख ६१ हजार ३४९ पुरुष तर १ लाख ४६ हजार १८ स्त्री मतदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी केवळ शपथपत्र आॅनलाईन अपलोड करण्यात आले होते. तर यंदा संपूर्ण प्रक्रियाच आॅनलाईन होणार आहे. इतकेच नव्हे, तर उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीचा वापर करूनच मिळणार आहे. 

विधानसभा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असलेली प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मतदान यंत्र वैजापूर तालुक्याच्या निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहे. ३८१ बॅलेट युनिट,  ३८१ कंट्रोल युनिट व ३८१ व्हीव्हीपॅट तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर काही बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट लोकसभेच्या निवडणुकीनंतर वैजापूरच्या  निवडणूक विभागाकडे शिल्लक होते. याचाच वापर विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी होणार आहे. वैजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण पावसाळ्याच्या दिवसात तापत आहे.

तक्रार निवारणासाठी १९५ नंबरविधानसभा क्षेत्रात अपंग मतदारांना मतदान केंद्रात कुठलाही त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअर ठेवली जाणार आहे. एक मतदार यादी पुस्तिकाही याठिकाणी ठेवली जाणार आहे. प्रथमोपचार पेटी याठिकाणी ठेवली जाणार आहे. तसेच तक्रार निवारणासाठी १९५ नंबर निवडणुकीच्या कार्यकाळात आणि मतदार यादीतील दुरुस्तीकरिता १९५ टोल फ्री नंबरची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर मतदारांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

३४६ मतदान केंदे्र असणार वैजापूर विधानसभा क्षेत्रात ३४६ मतदान केंद्रे असणार तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एक मतदान केंद्र्राध्यक्ष, १, २, ३ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन पोलीस कर्मचारी नियुक्त राहणार आहेत. यासोबतच संवेदनशील केंद्रावर विशेष पोलीस पथकांची नजर राहणार आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली  संयुक्त आढावा बैठकविधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाली आहे. याविषयी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी शनिवारी सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी अजयसिंग पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होत

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक