शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे ठरल...'औरंगाबाद मध्य'मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:46 IST

मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला एमआयएमने हिसकावून घेतला.

ठळक मुद्दे सेनेच्या बालेकिल्ल्यावर परत एकदा भगवा फडकविण्यासाठी सेना सज्ज झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीतर्फे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. जैस्वाल रविवारपासून मुंबईत तळ ठोकून होते. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या मत विभाजनाचा फायदा नवख्या एमआयएम पक्षाने घेतला होता. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघावर जैस्वाल यांनी अनेक वर्षे अधिराज्य गाजविले आहे. २००९ मध्ये तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली होती. कधीकाळी हा सेनेचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला एमआयएमने हिसकावून घेतला. सेनेच्या बालेकिल्ल्यावर परत एकदा भगवा फडकविण्यासाठी सेना सज्ज झाली आहे. भाजपकडून किशनचंद तनवाणी यांनीही ‘समांतर’तयारी ठेवली होती. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवून तनवाणीही चांगलेच पोळले आहेत. त्यामुळे युतीमध्ये मध्य मतदारसंघ भाजपला सुटल्यास निवडणूक लढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. अलीकडेच ते सेनेत जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. 

रविवारपासून मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रदीप जैस्वालही मुंबईतच तळ ठोकून होते. सेनेतील इतर इच्छुकांनाही मातोश्रीत बोलावण्यात आले. आमच्यातील कोणालाही उमेदवारी दिल्यास आक्षेप राहणार नाही, असे इच्छुकांकडून लिहून घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान, प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले होते. 

एमआयएमची अग्निपरीक्षाऔरंगाबाद मध्य मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने एमआयएम पक्षाने यश मिळविले होते, तसेच सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या पक्षात उमेदवारीवरून प्रचंड धुसफूस सुरू आहे. जावेद कुरैशी तलवार म्यान करण्यास तयार नाहीत. त्यांचे बंड थोपविण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २ आॅक्टोबरला पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी शहरात येणार आहेत. या दौऱ्यात ते कुरैशी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यShiv Senaशिवसेना