शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Maharashtra Assembly Election 2019 : तुम्ही 'शाह' असलात, तरी संविधानच बादशाह; ओवेसींचा अमित शहांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:18 IST

गांधींची हत्या करणारे आज श्रद्धांजली अर्पण करताहेत 

ठळक मुद्दे तबरेज अन्सारीची हत्या करणारेही गोडसेचे वंशजमाझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारेच आज देशभरात त्यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.मॉब लिंचिंगमध्ये झारखंड येथे तबरेज अन्सारीची हत्या करणारेही नथुराम गोडसेचे वंशज होते, तुम्ही 'शाह' असाल मात्र संविधान बादशाह आहे, असा हल्ला मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावरील जाहीर सभेतून चढविला. गांधींची विचारधारा समजून घ्या, हिंदू-मुस्लिमांच्या एकतेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले,  ट्रम्प साठी मोदी राष्ट्रपिता असतील पण माझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता आहेत असेही ओवेसी यांनी नमूद केले.

ओवेसी यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीचा औरंगाबाद जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला. पैठण येथील सभा संपल्यावर त्यांनी सायंकाळी आमखास मैदानावरील सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खा. इम्तियाज जलील यांच्यासह विधानसभेचे उमेदवार अरुण बोर्डे, नासेर सिद्दीकी, डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरैशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल ४२ मिनिटे ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी हत्येपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. खाजा कुतबोद्दीन बख्तियार यांची दर्गाह पुन्हा बांधावी, मुस्लिमांवरील होणारे अत्याचार थांबवावेत, अशी त्यांची मागणी होती. त्यांची हत्या गोडसेनी केली. गोडसेची विचारधारा जपणाऱ्यांच्या तोंडी आज गांधींचे नाव शोभत नाही. गांधींची विचारधारा अगोदर समजून घ्या. गोडसेच्या विचारांमुळेच झारखंडमध्ये निष्पाप तबरेज अन्सारीची हत्या झाली. ही हत्या करणारे गोडसेचे वंशजच आहेत. भाजप, आरएसएसवर  चौफेर टीका करीत एक नवीन भारत निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अच्छे अच्छे आये और गये...खा. इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘अच्छे अच्छे आये और गये...’ मजलीसला तोडण्याचा प्रयत्न केल्यास तेवढ्याच ताकदीने ती उभी राहील. मध्य मतदारसंघातील वादग्रस्त उमेदवारीच्या मुद्यावर ते म्हणाले की, पक्षप्रमुखांनी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या नागरिकाला उमेदवारी दिली तरी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

जावेद कुरैशी समर्थकांचा गोंधळगफ्फार कादरी यांचे भाषण सुरू असतानाच स्टेजच्या समोर काही तरुण जावेद कुरैशी, असदुद्दीन ओवेसी यांचे पोस्टर झळकावू लागले. कुरैशी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. याचवेळी कुरैशी यांची स्टेजवर एन्ट्री झाली. त्यांनी माईकचा ताबा घेऊन तरुणाईला शांत केले. ओवेसी यांचे भाषण सुरू झाल्यावरही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणा न थांबविल्यास मी खाली येईन, असा सज्जड दम त्यांनी भरला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन