शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

यंदा सर्वांत कमी पाऊस

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

दिनेश गुळवे बीड गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे.

दिनेश गुळवे बीडगेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या केवळ १३५ ते १४० मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वच हतबल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्र्षांपासून सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटग्रस्त म्हणून संकट उभे असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोे. जिल्ह्यात २०१२ सालीही मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. तर, २०१३ मध्येही अशीच परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. जनावरांसाठी चाराप्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने ४० पेक्षा अधिक ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत अल्प पाऊस झाला असला तरी या पावसावर सहा लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन बियाणांसह मशागत, खत, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला, आता मात्र पाऊसच नसल्याने भविष्यात काय होईल? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ढग येतात, पाऊस मात्र वारंवार हुलकावणी देत आहे.२०१० मध्ये ४५९ मि.मी, २०११ मध्ये ३९० मि.मी., २०१२ मध्ये १७९ मि.मी., २०१३ मध्ये ३८९ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत (९ आॅगस्ट) केवळ १४० मि.मी. पाऊस झाला आहे. ही पावसाची सरासरी जिल्ह्याची असली तर अनेक मंडळांमध्ये तर परिस्थिती अधिकच भयावह आहे.चारा छावण्या सुरू कराव्यात-आपेटमहाराष्ट्रातील इतर भागात पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर मशागतीवर हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र, पाऊसच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करावी व चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे.