शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भान हरवले; औरंगाबादमध्ये केवळ ६ टक्के मालमत्तांमध्येच होतेय जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:32 IST

तीव्र पाणीटंचाई, तरी रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रचंड उदासीनता

ठळक मुद्देशहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण

औरंगाबाद : पाणीटंचाईवर मात करण्याच्या पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच जलपुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. अनेक जलतज्ज्ञ याबाबत नेहमी माहिती देतात आणि पर्यावरणप्रेमीही पाणी वाचवा म्हणतानाच ‘पाणी जिरवा’ असे कटाक्षाने सांगतात. असे असतानाही आणि यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण योजना राबविण्यात आली आहे. टक्केवारी काढल्यास हे प्रमाण अवघे ५ ते ६ टक्के असल्याचेच दिसून येते. ज्या घरांमध्ये जलपुनर्भरण योजना सुरू करण्यात आली आहे, अशा लोकांना महानगरपालिकेकडून मालमत्ता करात १० टक्के कर सवलत मिळते. याशिवाय अनेक सामाजिक संघटना कमीत कमी पैसे घेऊन जलपुनर्भरण योजना बसवून देत आहेत. एकदा हा प्रकल्प घरात बसविला की, अनेक वर्षे यासाठी पुन्हा काहीही पैसा खर्च करावा लागत नाही; परंतु असे असतानाही जलपुनर्भरण करणाऱ्या मालमत्तांची संख्या न वाढणे खेदजनक आहे.

यंदा अवघ्या ३५ घरांमध्ये प्रकल्पसकल मारवाडी मिडटाऊन महिला शाखेतर्फे मागील दोन वर्षांपासून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्यात येतो. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या ग्रुपकडून काम केले जात असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे काम केले जाते. याविषयी ग्रुपच्या सदस्या पूनम सारडा म्हणाल्या की, मागच्या वर्षी जवळपास २५० घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत हा उपक्रम सुरू केला. हे प्रमाण यावर्षी अत्यंत कमी झाले असून, यंदा अवघ्या ३० ते ३५ घरांमध्येच हा प्रकल्प सुरू झाला.  कचरा प्रश्नाविषयी आता औरंगाबादकर जागरूक झाले आहेत; पण पाण्याच्या बाबतीत मात्र  जागरूकता आली नसल्याचेही सारडा यांनी सांगितले. प्रीती भक्कड आणि भक्ती संकलेचा या ग्रुपच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा असून जलपुर्नभरण प्रकल्पासाठी सारडा यांच्यासह सुप्रिया सुराणा, भारती तोतला, अलका अग्रवाल प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहतात.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद