शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

जलयुक्तच्या ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ला खो

By admin | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश असताना त्याला विभागीय पातळीवर ‘खो’ देण्यात आला आहे. औरंगाबाद आणि लातूर वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये कामांची तपासणी त्रयस्थांमार्फत झालीच नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या योजनेतील कामांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासन योजनेचा गवगवा करून दुष्काळावर मात केल्याचा दावा करीत असताना विभागात कामे अर्धवट व साशंकपणे झाली असतील तर यातून काय निष्पन्न होणार, असा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजनेत सिमेंट नाला बंधारा, नदी-नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, कालवा दुरुस्ती आदी कामे कृषी, लघु पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, जि. प. तर्फे केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता चांगली असावी यासाठी जलसंधारण विभागाने ५ डिसेंबर २०१४ व १३ मार्च २०१५ रोजी आदेश जारी केले आहेत. त्या आदेशानुसार योजनेतील कामे मार्चपूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. असे असताना मराठवाड्यातील लातूर व औरंगाबाद वगळता इतर कोणत्या जिल्ह्यांत कामांचे मूल्यमापन झाले नाही. जालना, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांत त्रयस्थ संस्था नेमण्यात आल्या, पण कामांचे मूल्यमापनच झाले नाही. बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत तर त्रयस्थ संस्थांची नेमणूकच केली गेली नाही. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेतील १६८२ पैकी अंदाजे ३५० गावांत कामे पूर्ण झाल्याचे दिसते. १३३२ गावांत आता कामे होतील, अशी शक्यता नाही. ४गेल्या वर्षी जलयुक्त शिवारसाठी १६८२ गावे निवडण्यात आली होती. मात्र, निधीअभावी त्या कामांना अपेक्षित गती मिळालीच नाही. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हास्तरावर याबाबत बैठकादेखील घेतल्या. मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जलयुक्त शिवाराची कामे केवळ प्रगतिपथावरच असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे.