जालना : शीतपेय कुलिंग करण्यासाठी खर्च लागतो, हा खर्च ग्राहकांची माथी मारल्या जात असल्याचे चित्र समोर आले आहे. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या विविध शीतपेयांच्या दुकानावर जाऊन किंमतीतील तफावत समोर आणली.^^^^^^^^^^^^^उन्हाळ्यामुळे सर्वच शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा फायदा काही दुकानदार घेत आहे. प्रत्येक शीतपेयांच्या बाटलीमागे पाच ते दहा रूपये अतिरिक्त घेतले जात असल्याचे चित्र आहे. यात नामांकित शीतपेयांच्या उत्पादन असलेल्या बाटल्यांवर छापील किंमत वजनानुसार असते. २०० मिली पासून अडीच लिटर पर्यंत कोल्ड्रींक्सच्या बाटल्या आहेत. मात्र अनेक दुकानदार जास्त किंमत घेत आहेत.ग्राहकांना नाहक पाच ते दहा रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. साडेसातशे मिली लिटरच्या बाटलीवर ३५ रूपये असले तरी अनेक दुकानदारांनी ४० अथवा ४५ रूपये घेतले. साधारणपणे सॉफ्ट ड्रिंक्स २५० मिली, ३०० मिली, ६०० मिली, एक लिटर, २ लिटर व अडीच लिटरमध्ये उपलब्ध आहेत.सर्वच बाटल्यावर असलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जाते.गुरूवारी अनेक ठिकाणी असे दिसून आले की, जास्त रक्कम का घेतली जाते तर कुलिंगसाठी आमची वीज जळते म्हणून आम्ही जास्त रक्कम घेतो असे काहींना सांगितले. काही व्यापाऱ्यांना याचे उत्तर देता आले नाही. काही दुकानदार असलेल्या किंमतीनुसारच पैसे घेत होते. एकूणच या शीतपेयांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
कुलिंगच्या नावाखाली होतेय ग्राहकांची लूट
By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST