शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

खासगी वाहनांच्या भाडेवाढीवर ‘आरटीओ’च्या पथकाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:53 IST

सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते.

ठळक मुद्देऔरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते.

औरंगाबाद : सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेता येणार आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. 

औरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. यंदाच्या उन्हाळ्यात हा आर्थिक फटका बसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एस. टी. बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि. मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एस. टी. महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी घेण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयाचे खाजगी वाहतूकदारांनी स्वागत केले. परंतु काही बाबी स्पष्ट नसल्याने संभ्रम असल्याचे म्हणणे आहे.

‘एस.टी.’ चे काही दर- औरंगाबाद - पुणे मार्गावर साध्या बसचे (लाल बस) २४२, शिवशाही बसचे ३७६, एशियाड बसचे ३४१ तर शिवनेरी बसचे ६५६ रुपये भाडे आहे. औरंगाबाद- नाशिक मार्गावर शिवशाही बसचे ३१९, साध्या बसचे २१५, एशियाड बसचे २९२ तिकीट दर आहे. - औरंगाबाद- नागपूर शिवशाही बसचे ८०८ तर साध्या बसचे ५६७ रुपये भाडे आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळ्याच्या सूत्रांनी दिली.

खाजगी वाहन चालकांनो सावधानएस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपटपेक्षा अधिक भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. कोणी जर अधिक भाडे आकारत असेल तर त्यासंदर्भात प्रवाशांना आरटीओ कार्यालयात तक्रार करता येईल. - संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अधिक पारदर्शकता हवीअनेक खाजगी बसचे दर हे ‘एस.टी.’पेक्षा कमी आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे अतिरिक्त बसेस सोडाव्या लागतात. एकेरी मार्गावरच गर्दी असते तेव्हा भाडेवाढ होते. परिस्थितीचा कोणीही गैरफायदा घेता कामा नये. परंतु एस. टी. आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये मोठा फरक आहे. जो निर्णय घेण्यात आला आहे, तो अधिक पारदर्शक केला पाहिजे.- राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन