शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

गल्लीबरोबरच मुंबईकडेही लक्ष..!

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून मुंबईकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून मुंबईकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.रविवारी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे जसजसे निकालाचे चित्र समोर येत जाईल, तसतसे मुंबईच्या तख्तावर कोण विराजमान होईल, हे स्पष्ट होणार आहे.सुरूवातीपासूनच या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता होती. सोशल नेटवर्किंगसह सर्वांच्याच हातात असलेल्या स्मार्टफोननेही त्यात भर टाकली. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकांविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, पाठोपाठ प्रचाराची रणधुमाळी उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी व परतूर या मतदारसंघात कमालीची उत्सुकता आहे. यंदा मतदानाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल याविषयी मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच चर्चा सुरू झाली होती. मतदानानंतर तीन-चार दिवसांच्या कालावधीत उमेदवार आकडेमोडीत रमले. शहरातील चौका-चौकात तर ग्रामीण भागातील पारा-पारावर निवडणुकीच्याच गप्पा रंगत होत्या. या गप्पांमधून स्थानिक उमेदवारापेक्षा मुंबईच्या आकडेवारीवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले होते. गल्लीतही मुंबईच्या गप्पा व राजकीय समिकरणे कशी होतील, राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोण मुख्यमंत्री होईल असे विविध अंदाज बांधण्यात येत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘एक्झीट पोल’मुळे तर या चर्चांना अधिकच रंगत आली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते छातीठोकपणे आपलाच उमेदवार निवडून येईल, यांचेच सरकार येईल, असे दावे दावे-प्रतिदावे करत होते. ग्रामीण भागातील पारापासून ते शहरातील चौका व व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैजाही लावल्या गेल्या आहेत. यातून कोट्यावधी रूपयांची देवाण-घेवाण होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. एकूणच विधानसभा निवडणूकीविषयी गाव, वस्ती, वाड्या-तांड्यावरील मंडळीही थेट मुंबईच्या सत्तेवर चर्चा करत आहे. (प्रतिनिधी)विजय कोणाचा होणार याविषयीची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.४१९ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासूनच शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक टीव्हीसमोर ठाण मांडून बसणार हे निश्चित. योगायोगाने या दिवशी रविवार असल्यामुळे हा सुटीचा दिवस नेमका कोणासाठी फायद्याचा ठरणार हे आता काही तासातच कळणार आहे. निवडणूक निकालांविषयी अबालवृद्धांमध्ये मोठी उत्सुकता आहे.