शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
4
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
5
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
6
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
7
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
8
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
9
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
12
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
13
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
15
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
16
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
17
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
18
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
19
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
20
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 

रजिस्ट्रीच्या व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर

By admin | Updated: December 23, 2015 00:07 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आयकर विभागाच्या रडारवर असून, जमीन खरेदी-व्रिकीच्या पूर्ण व्यवहारांवर विभागाची नजर आहे.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आयकर विभागाच्या रडारवर असून, जमीन खरेदी-व्रिकीच्या पूर्ण व्यवहारांवर विभागाची नजर आहे. आधारकार्ड किंवा पॅनकार्डशी लिंक करून सर्व व्यवहार होत असल्यामुळे देवाण-घेवाण करणाऱ्यांचा पूर्ण तपशील आयकर विभागाकडे रोज जमा होत आहे. एप्रिल २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात ४४ हजार १२४ खरेदी-विक्रीचे व्यवहार औरंगाबाद विभागांतर्गत झाले होते. या व्यवहाराच्या रजिस्ट्रीमधून १७४ कोटी रुपयांचा महसूल विभागाला मिळाला होता. एप्रिल २०१५ पासून ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंतच्या काळात ४३ हजार २६३ रजिस्ट्री झाल्या. त्यातून अंदाजे १८० कोटी रुपयांचा महसूल रजिस्ट्री विभागाला मिळाला. या सगळ्या व्यवहारांच्या नोंदी आयकर विभागाकडे गेल्या आहेत. दरवर्षी रेडीरेकनर दरानुसार फ्लॅट, जमीन, घरांच्या रजिस्ट्रीचे व्यवहार होतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होत असली तरी रेकॉर्डवर रेडीरेकनर दरानुसार रजिस्ट्री होते. ३५० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. ४ महिन्यांत १७० कोटी रुपयांचा महसूल कसा मिळवायचा, असा प्रश्न विभागासमोर आहे. यंदा तर तीन वर्षांच्या तुलनेत भीषण दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण होणे अवघड आहे. शहर वाढत असल्यामुळे जमिनींच्या व्यवहारातही वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच फ्लॅट व प्लॉट खरेदी-विक्रीचे प्रमाणही वाढणे अपेक्षित असताना नोव्हेंबर अखेरपर्यंत ६ हजार दस्त नोंदणी कमी झाल्या आहेत. मुळात हे प्रमाण १२ ते १५ हजारांपर्यंत जाणे अपेक्षित होते. दुष्काळाचा फटकामराठवाड्यात सतत तीन वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळाचा सर्वांत मोठा परिणाम जमीन विक्री-खरेदी आणि फ्लॅट, प्लॉट खरेदी व्रिकीच्या व्यवहारावर होत असून, रजिस्ट्री विभागाचा महसूल कमी झाला आहे. गेल्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत १०० कोटींचा रुपयांचा महसूल विभागाला मिळाला होता. या वर्षी १५ कोटींनी तो महसूल कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दुष्काळामुळे सुमारे ९ हजार रजिस्ट्री घटल्या आहेत.