शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फटाक्यांच्या आवाजावर प्रशासनाची नजर

By admin | Updated: October 18, 2014 23:47 IST

बीड : ठो ठो.. टु डूम डूम.. असा फटाक्यांचा आवाज कानावर पडला की, कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. मात्र फटाके वाजवणाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही.

बीड : ठो ठो.. टु डूम डूम.. असा फटाक्यांचा आवाज कानावर पडला की, कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. मात्र फटाके वाजवणाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती हा त्रास गुपचूप सहन करत आलेली आहे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या आवाजात फटाके वाजविणाऱ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे, फटाके वाजवून त्रास देणाऱ्यांना चाप बसणार आहे.दिवाळीचा सण आता अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वच सज्ज झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांसह अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांना जवळपास सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आता दिवाळीचा आनंदात सहभागी होत आहे.कपड्यापासून ते फटाके खरेदीपर्यंतची सर्वच तयारी झाली असून काही लोक आजही फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत.रात्री उशीरापर्यंत, रूग्णालय, गर्दीचे ठिकाण आदी ठिकाणी फटाके वाजविण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. कमी आवाजाचे फटाके वाजवून दिवाळी आनंदात साजरी करण्याचे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी सांगितले.बीडचे पथक उदासिनमोठ्या आवाजात फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कंट्रोल बोर्ड (एमपीएसबी) यांची नजर असते. मात्र खंत एवढीच आहे की, याचे कार्यालय कोठे आहे आणि याचे काय कार्य आहे, हेच कोणाला माहित नाही. तसेच या विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केला. या पथकाने कारवाई केली तर सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)अ‍ॅल्युमिनियम-किडनीचा आजार व वयोवृध्द लोकांना अशक्तपणा, हाडांच्या वेदना, पचनक्रियेत अडथळा, छातीतील जळजळ, भावनिक अस्थिरता.४सल्फर डायआॅक्साईड-हृदय, डोळे, कान, यकृत, किडनी यांना इजा.४पोटॅशियम नायट्रेट - श्वसन मार्गावर परिणाम, पोटात दुखणे, दम लागणे, भोवळ येणे, मानसिक अवस्था,४बेरियम- अशक्तपणा, श्वसनाला अडथळा, अतिसार, शक्ती कमी होणे, बधीरता येणे.फटाक्यातील धुरामधून कार्बन डायआॅक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, शिसे, व्हॅनाडियम, कॉपर, आयर्न, अ‍ॅल्यूमिनीअम, मॅग्नीज, झिंक यासारखे घातक वायू बाहेर पडतात.४हे वायू पर्यावरणाबरोबरच आरोग्याला धोकादायक ठरत असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ.संजय जानवळे सांगितले़४मोेठ्या आवाजापेक्षा कमी आवाजांच्या फटाक्यांमध्ये जास्त विषारी धातू असतात. ते बालकांच्या आरोग्याला खूप धोकादायक असतात. ४त्यापासून अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात, त्यामुळे लहान मुलांना फटाके फोडू देऊ नयेत, असा सल्ला डॉ़ जानवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़