शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:13 IST

‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.

ठळक मुद्देकाँग्रेसवर टीका करण्याच्या प्रयत्नात सुरेध धस बरळले; चूक लक्षात येताच केली सारवासारव

औरंगाबाद : ‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.बीड लोकसभा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे भाजपचे आमदार सुरेश धस यांची बुधवारी रात्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. आ. धस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात हवाई दलाचे धाडसी अधिकारी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात येताच सारवासारव करीत ‘मला त्यांची तुलना वीरप्पन याच्याशी करायची नाही’, असेही सांगून टाकले.आ. सुरेश धस म्हणाले की, ‘आधी बॉम्ब टाकायचे आणि ह्यांना सोडायचे. (काँग्रेस नेत्यांना) नको नाही तर हे पण जातील अतिरेक्याबरोबर. (हंशा, टाळ्या) तसं कसं करायचं. मारायचं नाही. पुन्हा माघारी आणायचं भाषण करायला. टावरचं लोकेशन सांगतंय की, तिथं तीनशे मोबाईल होते. जल्लोष करायला बोलावले होते. हे नालायक जे भारताचं सतत वाईट वाईट वाईट... पाहतात. हे अतिरेकी जल्लोष करीत असतानाच्या रात्री विमानं गेली. अडीच हजार ताशी किलोमीटर वेग असतोय त्याचा. त्याठिकाणी पटपट बॉम्ब टाकायचे असतात. २० मिनिटांत तर सगळा कार्यक्रम उरकायचा असतो. ओसामा बिन लादेनला काय दहा-पंधरा दिवस तापासीत होते काय? वटा वटा वटा गेले... खाली उतरले. पटा पटा पकडलं. उचललं. आणलं अन् समुद्रात नेऊन टाकलं. कबरबी नको. कायीच नको. मला वाटतं... यापुढं एअर स्ट्राईक करायचा असल, तर देशाच्या पंतप्रधानाला सांगून काँग्रेसचे दोन-चार लोक खाली लटकवून पाठवा. बॉम्ब टाकताना त्यांच्या हातात कॅमेरे द्या. तेथून खाली सोडा. ते खाली सुटल्यानंतर बॉम्बस्फोट होतील. त्याचं चित्रण करतील. परत त्यांना अणण्यासाठी अ‍ॅम्बसी विनंती करील ना.. आमचे ते खाली सोडलेले काँग्रेसचे नेते भारताकडं सोपवा. म्हणजे इकडं येऊन भाषण करतील. (हंशा.. टाळ्या.. शिट्या..) ‘तो आणला नाही का वीरप्पनसारखा गडी (मिशावर हात दाखवून वर्णन)’ वीरप्पन म्हणून त्यांचा अपमान करणार नाही; पण तो होता एक अभिनंदन पांडे. तामिळनाडूचा. गरीब पठ्ठ्या आला की नाही परत. मारलं त्याला. रक्तबंबाळ केलं. ‘भारत माता की जय’ म्हटलं तरी कळत नव्हतं. (चूक लक्षात आल्यामुळं.) आता काय करावा बबा. बोलावं का नाय. असं झालंय. त्यांची तुलना करत नाही; पण वीरप्पनसारखी स्टाईल हाय त्यांची. मी त्यांची तुलना करणार नाही; पण गडी आमचा ६० तासांत परत आला, अशा पद्धतीने आ. धस यांनी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात आल्यानंतर सारवासरावही केली. तत्पूर्वी, सोशल मीडियामुळे बोलायची भीती वाटत असल्याचेही कबूल केले. या सभेला बीड जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक