शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉन : तुम्हीही होऊ शकता सहभागी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:12 IST

संपूर्ण औरंगाबाद शहराला ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहेत ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. रविवारी (दि.१७) सकाळी सहा वाजता सुरू होणाºया या स्पर्धेसाठी हजारो धावपटूंनी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू केलेली आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू सज्ज झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संपूर्ण औरंगाबाद शहराला ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहेत ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. रविवारी (दि.१७) सकाळी सहा वाजता सुरू होणाºया या स्पर्धेसाठी हजारो धावपटूंनी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू केलेली आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू सज्ज झाले आहेत.मात्र, लोकमतच्या पुढाकाराने सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी न होऊ शक लेल्या शहरवासीयांनी नाराज होण्याचे कारण नाही. कारण, तुम्हीदेखील या स्पर्धेत तेवढ्याच हिरीरीने सहभागी होऊ शकता. कारण ही स्पर्धा औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकाची आहे.मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच या धावपटूंचा उत्साह वाढविणे हेसुद्धा मॅरेथॉनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो संपूर्ण शहराला पूर्ण करायचा आहे. या स्पर्धेत आपलाही सक्रिय सहभाग असणे फार आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा यासाठी काही ‘आयडिया’ येथे देत आहोत.जे तरुण काही कारणास्तव मॅरेथॉनमध्ये धावणार नसतील त्यांनी घरी शांत बसू नये. युवक-युवती चेहºयावर रंग लावून, फेटे बांधून, आकर्षक पेहराव करून मार्गावर येऊ शकतात. तारुण्याचा सळसळता जोम धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दिसावा.गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेला शहरवासीयांना जसा भरभरून प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद होता. पहिल्याच वर्षी औरंगाबादकरांचे मनापासून प्रेम मिळाल्याने पहिली लोकमत मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीठरली.तर मग औरंगाबादकरांनो रविवारी सकाळी आळस न करता घराबाहेर येऊन मॅरेथॉन रनर्सना मनापासून ‘चिअर अप’ करा. कारण ‘मी धावतोय शहरासाठी, शहर धावतेय माझ्यासाठी’ हे विधान आपल्याला खरे करून दाखवायचे आहे.औरंगाबादकरांनो, वाढवा धावपटूंचा उत्साहजे शहरवासी धावणार नसतील ते आपल्या घराबाहेर येऊन मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाºयांचा उत्साह वाढवू शकतात. तुमच्या प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह आणि ऊर्जा द्विगुणित करतील. त्यांना छोट्या-छोट्या पेपर ग्लासमध्ये सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, लिंबू सरबत असे पेयसुद्धा आपण देऊ शकता.विशेषत: शाळकरी मुलांनी व्यायाम आणि आरोग्याची प्रेरणा घेण्यासाठी सकाळी लवकर उठून मॅरेथॉन मार्गावर हजर राहून मोठ्या उत्साहात धावपटूंचे मनोबल वाढवावे. तुमच्यासोबत आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवारालाही सोबत आणा. पालकांनीदेखील आवर्जून मुलांना घेऊन यावे.रांगोळी स्पर्धा :प्रथम बक्षीस ५ हजार रुपयेरांगोळीचे आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून मॅरेथॉनपटूंच्या स्वागतासाठी आपणही मॅरेथॉन मार्गाच्या कडेला आकर्षक रांगोळी काढून सजावट करून शकता. रांगोळीतून आरोग्य आणि सामाजिक संदेश दिला तर अधिकच उत्तम. रविवारी सकाळी मॅरेथॉन मार्गापाशी काढलेल्या तीन सर्वोत्तम रांगोळींना अनुक्र मे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांची नावे ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध केली जातील.पोस्टर स्पर्धा :प्रथम बक्षीस ३ हजार रुपयेशालेय विद्यार्थ्यांनाही आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी आहे. ‘ए-३’ आकाराच्या कागदावर शाळकरी मुलांनी विविध सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स तयार करून ते मॅरेथॉन मार्गावर दर्शनीय भागावर लावावेत. ‘लोकमत’ टीमतर्फे त्यांची पाहणी करून तीन सर्वोत्तम पोस्टर्सची निवड केली जाईल. विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.मॅरेथॉन मार्गावर ढोल-ताशा, गाणे-संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता. सकाळच्या गुलाबी थंडीत धमाल मस्तीवाला ‘माहौल’ असेल तर मॅरेथॉनपटूंचेही पाय तेजीने धावू लागतील. तसेच यानिमित्त बाहेरून येणाºया धावपटूंना औरंगाबादकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल.