शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर आजपासून खुले

By admin | Updated: May 30, 2014 00:32 IST

नांदेड : सर्व शैक्षणिक संस्थांची परिपूर्ण माहिती देणारे 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'आजपासून सर्वांसाठी खुले होत आहे़

नांदेड : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासह सर्व शैक्षणिक संस्थांची परिपूर्ण माहिती देणारे 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'आजपासून सर्वांसाठी खुले होत आहे़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे आहेत. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे़ विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे़ या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे़ शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या लोकमत समूहातर्फे यंदाही एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन केले आहे़ ३० मे ते १ जून दरम्यान मल्टीपर्पज हायस्कूल, वजिराबाद नांदेड येथे भव्य शैक्षणिक प्रदर्शन भरणार आहे़ पालक असो वा पाल्य, त्यांच्या मनात भावी शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, कुशंका असतात़ त्या प्रत्येक शंकांचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे़ शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ प्रदर्शनात मार्गदर्शन करणार आहेत़ याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे़ 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' हे राज्यस्तरीय प्रदर्शन १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे़ यात औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे़ ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, श्री गुरु गोविंदसिंघ बी़ जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपूरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णुपूरी, नांदेड, एस़ जी़ एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टीट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टीट्युट आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट पुणे, एम़ जी़ एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा जि़ हिंगोली आदी संस्था सहभागी झाल्या आहेत़ तीन दिवस चालणार्‍या एज्युकेशन फेअरमध्ये सर्वांसाठी प्रवेश व मार्गदर्शन निशुल्क राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले़ (वाणिज्य प्रतिनिधी) आजचे सेमिनार सीबीएससी अ‍ॅन्ड सीसीई इनकन्टेटपरी एज्युकेशन या विषयावर होरायझन डिस्कव्हरी अ‍ॅकेडमीचे प्राचार्य डॉ़ फनिंद्र बोरा यांचे सेमिनार सायंकाळी ५ वाजता होईल़ आई-बाबांची शाळा व मुलांच्या अभ्यासाच्या सवयी या विषयावर जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे हे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मार्गदर्शन करणार आहेत़ भेट देणार्‍यांसाठी भेटवस्तू प्रदर्शनाला भेट देणार्‍यांपैकी एका भाग्यवंताला दर तासाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल़