शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : केंद्र शोधण्यासाठी धावपळ, व्होटर स्लीप चुकीच्या; नावे गहाळ झाल्याने मतदारांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:54 IST

निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासनाकडून मतदारांचे समाधान झाले नाही.

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी वाटप केलेल्या व्होटर स्लीप चुकीच्या निघाल्या, तर काही मतदारांना केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारीदेखील मतदारांनी टोल फ्री क्रमांकावर केल्या; परंतु निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासनाकडून मतदारांचे समाधान झाले नाही.

बहुतांश परिसरात व्होटर स्लीप मिळाल्याच नव्हत्या. कुटुंबांची नावे एकाच यादीत व भाग क्रमांकांत यावीत, यासाठी राजकीय पक्षांनी मागणी केली होती. मात्र, त्याबाबत प्रशासनाने पाऊल उचलले नसल्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांना दोन ते तीन मतदान केंद्रांच्या व्होटर स्लीप आल्या आहेत. कडा आॅफिस खोली क्र.२, किड्स इंग्लिश स्कूल या मतदान केंद्रांवर पुंडलिकनगरमधील मतदान विभागले गेले. मतदारांची केंद्र शोधण्यात धावपळ झाली.

सिंधी कॉलनीतील मतदान केंद्र बदलण्यात आल्यामुळे मतदार मतदान न करताच परत गेले.  शहरातील तिन्ही मतदारसंघातील मतदारांनी नावे गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. मतदान केंद्राची पुनर्रचना होत असताना काही नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर गेली. ‘गो व्हेरीफाय’ हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबविला. २० मार्चपर्यंत या कार्यक्रमांतर्गत मतदारांनी स्वत:च्या नावाची शहानिशा करणे गरजेचे होते. ज्यांनी शहानिशा केली, ज्यांची नावे यादीत नाहीत, ती समाविष्ट करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले. 

छावणीतील केंद्र बदललेल्या १ हजार २३१ मतदारांची अडचणलोकसभेसाठी मंगळवारी (दि.२३) झालेल्या मतदानात औरंगाबादेतील छावणीमधील मतदान केंद्र क्रमांक १२२ हे क्राईस्ट चर्च हायस्कूल येथून अचानक बदलून होलिक्रॉस इंग्रजी शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे या मतदान केंद्रावरील १,२३१ मतदारांना होलिक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचण्यास दिवसभर अडचण निर्माण झाली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019