शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : तरुणांना हवे शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:36 IST

‘लोकमत’ने जाणून घेतल्या नवमतदारांच्या अपेक्षा

औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघाचा विचार केल्यास यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने नवमतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींबद्दल असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून रोजगार, महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान, असे प्रश्न प्रामुख्याने समोर आले. 

महिलांची सुरक्षा महत्त्वाची आज औरंगाबाद शहरात महिला सुरक्षित आहेत; पण या सुरक्षिततेत अजून वाढ होण्याची गरज आहे. बलात्कार, छेडछाडीच्या घटना शहरात वाढत असून, यावर नियंत्रण हवे. त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृह आणि महिला कक्षाची निर्मिती व्हायला हवी. -श्रेया रतन 

नागरी सुविधांची गरजरस्ते, पाणी व वीज, असे शहरातील प्रश्न ऐरणीवर आले असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज आहे. सर्वप्रथम नागरी सुविधा सोडवाव्यात आणि त्यानंतर औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी कसे होईल यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी विचार करावा.-प्रथमेश दीक्षित  

बेरोजगारी कमी करणारा नेता हवातरुणांना रोजगार मिळावा म्हणून अनेक सरकारी योजना आहेत; पण या योजनांचा लाभ सर्वसामान्य तरुणांना मिळताना दिसत नाही, अशा योजना तरुणांपर्यंत पोहोचवून आणि नवीन रोजगारनिर्मिती करून बेरोजगारी कमी करणारा लोकप्रतिनिधी असावा.     -सोमीनाथ दगडघाटे 

तंत्रज्ञानाची कास धरावीलोकसभा निवडणूक म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार केल्यास तंत्रज्ञानाची कास धरणारा लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानात झालेले बदल, सोशल मीडियाची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलणारा नेता हवा.     -अजिंक्य दहीवड  

शिक्षण क्षेत्रात बदल अपेक्षितलोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फक्त शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासावरही लक्ष देणे गरजेचे आहे.  -उमेश ठोंबरे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादStudentविद्यार्थी