शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पदांची खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:50 IST

सहा विधानसभा मतदारसंघांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असताना चार सहसंपर्कप्रमुख नियुक्त करण्याची किमया शिवसेना नेत्यांनी साधली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत खिरापतीप्रमाणे पदे वाटली जाऊ लागली आहेत. जे पदाधिकारी (महिला आघाडीसह) राजीनामा देऊन पक्ष सोडून गेले होते. त्यांना देखील मोठ्या पदांचे गिफ्ट देऊन खुश करण्यात आल्यामुळे निष्ठावान पदाधिकाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. 

सहा विधानसभा मतदारसंघांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असताना चार सहसंपर्कप्रमुख नियुक्त करण्याची किमया शिवसेना नेत्यांनी साधली आहे. सुहास दाशरथे, अण्णासाहेब माने, आ. संदीपान भुमरे यांच्याकडे सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना सहसंपर्कप्रमुख करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आ. भुमरे वगळता उर्वरित तिन्ही सहसंपर्कप्रमुख औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत.  राजीनामा देणाऱ्यांना पुन्हा पक्षप्रवेश देण्यापूर्वी वरिष्ठ पातळीवर परवानगी घेणे गरजेचे आहे; परंतु सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वरिष्ठांच्या परवानगीला बगल देण्यात येत आहे. 

१७ उपजिल्हाप्रमुखांचे संघटननाराजांना उपजिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीचे पत्र देऊन खुश करण्यात येत असल्याची माहिती सेनेच्या गोटातून मिळाली आहे. ९ तालुक्यांच्या जिल्ह्यात १७ उपजिल्हाप्रमुख नेमण्याचा प्रकार सुरू झाला आहे. जे विद्यमान उपजिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्याकडेच कुठलीही संघटनेची जबाबदारी नाही, त्यातच आणखी नवीन पदधारकांची भर पडणार असल्यामुळे विद्यमान उपजिल्हाप्रमुख नाराज झाले आहेत. ३ उपजिल्हाप्रमुखांवर जबाबदारी असलेला हा जिल्हा १७ पदाधिकारी नेमण्याइतका मोठा झाला आहे. विनायक पांडे, आनंद तांदूळवाडीकर यांना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पांडे आणि सेना नेत्यांमध्ये मागील काही वर्षांपासून वाद आहेत, त्यातून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी केली होती; परंतु त्यांना पुन्हा जवळ करण्यामागे फक्त निवडणूक हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९