शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ओल्या बाळंतिणीने बजावला मतदानाचा हक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:06 IST

रोहिणी निकम यांनी राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा व्यक्त केला आनंद

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देणे हे प्रत्येक मतदाराचे आद्य कर्तव्य असते. एखादा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक मत हे खूप मोलाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या औरंगाबाद मतदारसंघासाठीचे मतदान आज पार पडले. शहराच्या रामनगर भागातील रहिवासी निकम दाम्पत्याने सुजाण नागरिक असल्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. योगेश निकम यांच्या पत्नी रोहिणी निकम यांनी एक दिवसाच्या बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी देशाप्रती असलेले आपले कर्तव्य निभावल्याचा आनंद व्यक्त केला. 

रामनगर येथील रहिवासी योगेश निकम हे ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’मध्ये कार्यरत असून, त्यांच्या पत्नी रोहिणी निकम (२९) या गृहिणी आहेत. दोन मुली असलेल्या रोहिणी यांनी त्यांच्या तिसऱ्या अपत्याला २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी जन्म दिला. चेतनानगर येथील चौबे हॉस्पिटलमध्ये त्या अ‍ॅडमिट होत्या. प्रसूती वेळेत झाली तर आपण मतदान नक्की करू, असा त्यांनी निश्चय केला होता. प्रसूती झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाण्यापूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. रामनगर येथील श्रीराम प्राथमिक शाळा येथे सकाळी ११:३० या वेळेत जाऊन त्यांनी मतदान के ले. यावेळी त्या म्हणाल्या,‘ मी आज खूप खुश आहे. प्रसूतीनंतरही माझा हक्क बजावता आला यातच मोठा आनंद सामावलेला आहे. देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडीसाठी असलेले माझे कर्तव्य मी पार पाडले आहे.’

जागरूक मतदाराचे कर्तव्य निभावले‘देशाचा विकास होण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सिंहाचा वाटा असतो. योग्य आणि कार्यतप्तर उमेदवाराची निवड करणे हे मतदाराचे प्रथम कर्तव्य असते. आज मी देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले याचा मला प्रचंड आनंद आहे. मी माझ्या एक दिवसाच्या बाळाला घेऊन मतदानासाठी आले आहे. याचे त्याच्यावरही चांगलेच संस्कार होणार आहेत. तो भावी मतदार असून त्यालाही भविष्यात माझ्याप्रमाणेच प्रत्येक अडचणीवर मात करून देशासाठी आपले कर्तव्य बजावायचे आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019