शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

Lok Sabha Election 2019 : लोकप्रतिनिधींकडून उत्तम नागरी सुविधांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 7:59 PM

महिलांशी संवाद साधून ‘लोकमत’ ने जाणून घेतल्या अपेक्षा

औरंगाबाद : कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार जिंकून आला तरी जोपर्यंत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही पद्धती खऱ्या अर्थाने उपयोगात आली, असे म्हणता येत नाही. त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील काही महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

उत्तम नागरी सुविधांची गरज-समांतरचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला; पण आजही औरंगाबादकरांना पाण्यासाठी झुंजावे लागते. पाणीपुरवठा अल्प असून, अनियमित आहे. नियमितपणे टॅक्स भरूनही आज मुबलक पाणी नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. यासोबतच रस्ते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे उत्तम नागरी सुविधा निर्माण करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे.- मंजूषा कोरंगळीकर

पर्यटन स्थळांचा विकास व्हावा-औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, पर्यटन स्थळांचा अधिकाधिक विकास करून या मार्गे रोजगार निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून परदेशी चलन मोठ्या प्रमाणात शहरात येऊ शकते आणि अनेक उद्योगांना चालना मिळू शकते. म्हणून इतर अनेक गोष्टींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पर्यटनाकडेही लक्ष द्यावे.- ऊर्मिला मगर

महिला सुरक्षितता महत्त्वाची-महिला मतदार अत्यंत जागरूकपणे मतदान करतात; पण लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सुरक्षेचा विचार अजिबात केला जात नाही. सकाळचे दहा असो की रात्रीचे दहा. महिला, तरुणी अजिबात सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षितपणे घरी येऊ शकेलच याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. - अलका अमृतकर

प्रदूषणावर तोडगा आवश्यकप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये औरंगाबाद शहराचे नाव बरेच आघाडीवर आहे. प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस अशीच वाढत राहिली, तर लवकरच प्रत्येकाला आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल.  वृक्ष लागवड आणि कचरा या दोन गोष्टींवर प्रामुख्याने काम व्हायला हवे. लोकप्रतिनिधींना जनता साथ देईलच; पण आधी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- निशी अग्रवाल

कचरा प्रश्नावर तोडगा हवाऔरंगाबादचा कचरा प्रश्न आता केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. वर्ष उलटून गेले तरी हा प्रश्न अजूनही पुरता सुटलेला नाही. आजही अनेक परिसरांमध्ये कचऱ्याच्या गाड्या अनियमित येतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढणारा आणि कचऱ्यापासून औरंगाबादकरांची मुक्तता करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. काहीच काम न करताही आपण निवडून येऊ शकतो, असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. - नीला रानडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादWomenमहिला