शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची बँकांना तंबी; संशयित व्यवहारांची दररोज द्यावी लागणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:48 IST

दररोज माहिती न कळविल्यास थेट कारवाई करण्यात येईल

औरंगाबाद : निवडणुकीच्या काळात खात्यांमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहाराची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाला कळविणे सक्तीचे आहे. मात्र, ज्या बँका माहिती पाठवत नाही, त्या बँकांच्या प्रतिनिधींना बोलावून निवडणूक आयोगाने तंबी दिली आहे. दररोज माहिती न कळविल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू वेग येत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग व  आयकर विभागाने कंबर कसली आहे. मतदारसंघात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारावर विभागाची करडी नजर राहणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने शीघ्रकृती पथकही तयार केले आहे. तर दुसरीकडे संशयित खात्यांमध्ये होणाऱ्या व्यवहाराची माहिती बँकांना दररोज निवडणूक आयोगाकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, को-आॅपरेटिव्ह बँकांचा समावेश आहे.  निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर लक्ष ठेवणे. याशिवाय कोणत्याही बँकांमधील खात्यात मोठ्या रकमेचा भरणा किंवा रक्कम काढण्यात आली असेल. ज्या खात्यात व्यवहार होत नाही, पण अचानक निवडणूक काळात या खात्यात लाखो रुपये जमा झाले असतील, तर अशा सर्व संशयित खात्यांची माहिती बँकांना दररोज संध्याकाळी निवडणूक आयोगाला द्यावी लागत आहे.

मात्र, या आदेशाकडे काही बँकांनी दुर्लक्ष केले होते. ही बाब निवडणूक विभागाच्या लक्षात येताच निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाच्या वतीने सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बँकनिहाय अहवाल मागविण्यात आला. ज्या बँका दररोज अहवाल सादर करीत नाही त्यांना अधिकाऱ्यांनी तंबी दिली. तसेच निवडणूक आयोगाचा आदेश मानला नाही तर बँकांवर काय कारवाई होऊ शकते याची माहितीही संबंधितांना देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत काही बँकांनी दैनंदिन व्यवहाराची माहिती विभागाला पाठविली होती.

आयकर विभागाचे अधिकारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने राज्यात ६ कोटी रुपये काळा पैसा जप्त केला होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा काळा पैसा वापरण्यात येणार होता. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाच्या रडारवर बँका आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019