शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदार शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:17 IST

जिल्ह्यात ६५ हजार ५१९ दिव्यांग मतदारांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार येते.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात रेकॉर्ड २० हजार मतदार जनगणनेनुसार ६५ हजार ५१९ पर्यंत मतदार संख्या

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदार शोधण्याचे आणि त्यांना मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. २० हजार मतदारांची संख्या सध्या असल्याचे प्रशासनाचा दावा आहे. 

जिल्ह्यात ६५ हजार ५१९ दिव्यांग मतदारांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार येते. १४ वर्षांपर्यंतचे सुमारे ३३ हजार ६८० दिव्यांग वगळून हा आकडा समोर आलेला आहे. यातील मृत मतदारांचा आकडा वगळला तरी उर्वरित मतदार रेकॉर्डवर कसे आणणार असा मुद्दा आहे. यातील औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार रेकॉर्डवर आणावे लागणार आहेत. २० ते २९ वयादरम्यान १७ हजार १८, ३० ते ३९ दरम्यान १४,२४४, ४० ते ४९ वयादरम्यान १० हजार ९७६, ५० ते ५९ दरम्यान ७ हजार ६१९, ६० ते ६९ वयादरम्यान ७ हजार ७६५ मतदारांची जनगणना करण्यात आली होती. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी या प्रकरणात बैठक घेतली.  दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेर आवश्यक साह्य एनएसएस आणि भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर सहाय्य करण्याबाबतचे नियोजन शिक्षण, एनएसएस आणि स्काऊट गाईडच्या संबंधित विभागाने करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांना मतदानाच्या दिवशी द्यावयाच्या नियोजित सुविधांबाबत आयोजित बैठकीत चौधरी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक सतीश देशपांडे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटन आयुक्त शीतल शिंदे, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण आदींची उपस्थिती होती.

एनएसएस, स्काऊट गाईडची मदतलोकसभा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा स्वयंसेविका विशेष काळजी घेणार आहेत. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), स्काऊट गाईडचे विद्यार्थी साह्य करणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादVotingमतदान