शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतदान होताच उमेदवार झाले रिलॅक्स; विजयाचा प्रत्येकानेच केला दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:23 IST

खैरे शिर्डीला, झांबड शहरातच, जलील मालेगावला, जाधव यांची कॉफीवर चर्चा

 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर सर्व उमेदवारांनी २४ तारखेला स्वत:ला एकदम तणावमुक्त अनुभवले. प्रमुख चार उमेदवारांसह सर्व २३ उमेदवार निवांत झाले. आता प्रतीक्षा आहे निवडणूक निकालाची. १० मार्च आचारसंहिता लागल्यानंतर २३ एप्रिल रोजी मतदान होईपर्यंत सर्व उमेदवार तणावात असल्याचे वातावरण होते. या निवडणुकीत प्रमुख उमेदवार असलेल्या शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांनी आपापल्या विजयाचा दावा ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी निवासस्थानी पूजा करून शिर्डी मतदारसंघातील उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रस्थान केले. महायुतीचे उमेदवार खा. खैरे यांनी दावा केला, मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर चांगल्या प्रमाणात मतदान झाले आहे. मतदारांनी  भरूभरून मतदान केले असून विजयश्री १०० टक्के मिळेल. - खा. चंद्रकांत खैरे 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांनीही कुटुंबियांसमवेत दिवस घालविला. ते म्हणाले की, मला ग्रामीण व शहरी भागात मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यावेळी कधी नव्हे एवढे जाती- पातीचे राजकारण घडले. पण आमचे धोरण विकासाचे होते. आता मी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे आभार मानणार आहे.- आ. सुभाष झांबड 

एमआयएमचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी बुधवारी मालेगाव येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराकरिता हजेरी लावण्यासाठी औरंगाबाद सोडले. आ. जलील म्हणाले, मतदारांनी जो काही कौल दिला असेल तो २३ मे रोजी समोर येईल. कार्यकर्ते अंदाज बांधत असतात. मी अंदाज वगैरे काही बांधलेला नाही. जे होईल ते पाहू या. - आ. इम्तियाज जलील 

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एका कॉफी शॉपवर निवांतपणे कॉफी घेत मित्र परिवार आणि काही निवडक कार्यकर्त्यांसोबत मतदानाचा आढावा घेतला. आ. जाधव म्हणाले की, काय होईल ते बघू या. निवडणूक संपली आहे. मतदारांनी मतदान केले आहे. मतदारांनी काय निर्णय घ्यायचा होता तो घेतला आहे. २३ मे रोजी मतदारांचा कौल कळेल. - आ. हर्षवर्धन जाधव 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019