शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : प्रचारात सोबत उतरण्यासाठी भाजपला प्रतीक्षा सेनेच्या ‘अक्षतां’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 16:17 IST

सेनेने जि.प.तील काँग्रेसची साथ सोडली तरच प्रचार करण्याची भूमिका

ठळक मुद्दे२७ तारखेला भाजप - सेना समन्वयकांची बैठक होणार शिवसेनेतही अंतर्गत गटातटाची लढाई सुरू

औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजपची महायुती होऊन २४ रोजी प्रचाराचा नारळ फुटला असला, तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने अजून भाजपला प्रचारात सोबत उतरण्यासाठी ‘अक्षता’च पाठविलेल्या नाहीत. 

आधी जि.प.मध्ये सुरू असलेला काँग्रेससोबतचा संसार शिवसेनेने मोडावा, त्यानंतरच पूर्ण ताकदीने प्रचारात उतरू, असा इशारा भाजपने दिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींबाबत २७ मार्च रोजी शिवसेना-भाजप समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. समन्वयकांच्या बैठकीत जि.प.च्या सत्ता समीकरणावर काही आश्वासक निर्णय झाला नाही तर शिवसेनेने प्रचारासाठी वºहाडी म्हणून दिलेल्या ‘अक्षता’ स्वीकारायच्या की नाही, हे भाजपची नेते मंडळी ठरविणार आहेत. 

प्रदेश उपाध्यक्षांचे मत असेभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, शिवसेनेच्या प्रचारात अजून भाजप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. २७ मार्च रोजी भाजप आणि शिवसेना समन्वयकांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भाजप शिवसेनेसमोर जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याची अट ठेवणार आहे. कॉंग्रेससोबत युती तोडून भाजपसोबत सेनेने युती करावी, अशी आमची अट असणार आहे. त्यावर शिवसेना काय भूमिका घेईल, ते पाहू. त्यानंतर शिवसेनेसोबत प्रचारात उतरण्याचा निर्णय घेऊ. 

अर्धा भाजप विदर्भ आणि मराठवाड्यातभाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कूच केले आहे. यामध्ये उद्योग आघाडीचे हेमंत खेडकर व इतर बीडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आहेत. तसेच मंगळवारपासून भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर काही नगरसेवकांसह नागपूरमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. मतदान होईपर्यंत हे पदाधिकारी तिकडेच असणार आहेत. अजून बरेच पदाधिकारी लातूर, जालना मतदारसंघात प्रचारासाठी गेले आहेत. 

शिवसेनेतही गटातटाची लढाई भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यांत प्रस्थान केल्यामुळे शिवसेना उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत अंतर्गत गटातटाची लढाई सुरू आहे, त्यातच शहरातील भाजपने अजून साथसंगत करण्यास सुरुवात केलेली नाही.हा सगळा प्रकार रक्तदाब वाढविणारा आहे. त्यामुळे सेनेतील काही पदाधिकारी अजून प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. जे सक्रिय झाले आहेत, त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. काही पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरीची भाषा सुरू असून, हाणामारीपर्यंत प्रकरण जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा