शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद मतदारसंघावर साडेसहा लाख दलित-मुस्लिम मतदारांचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:10 IST

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने १९९१ सालापासून एक हाती सत्ता गाजवली आहे. 

- विजय सरवदे  

औरंगाबाद : सेनेने प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली, तरीही काँग्रेसने सेनेला प्रत्येक निवडणुकीत कडवी झुंज दिली. प्रामुख्याने काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे मुस्लिम व दलित आहेत. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ‘एमआयएम’ हा पक्ष औरंगाबादेत स्थिरावला. 

औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडून आले. महानगरपालिकेतही या पक्षाचे २४ नगरसेवक आहेत. अलीकडे, राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे ‘सुप्रीमो’ आहेत. औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आघाडीच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा झाल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘एमआयएम’चे  जलील हे उमेदवार आहेत. आतापर्यंत सतत काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या दलित- मुस्लिम मतदारांचा कल यावेळी कोणाकडे, हेच निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात ४ लाख १८ हजार मुस्लिम मतदार, सव्वादोन लाख दलित मतदार आणि साडेपाच-सहा लाख ओबीसी मतदार आहेत. 

औरंगाबाद शहरावर संपूर्ण लक्ष !इम्तियाज जलील हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी असले, तरी त्यांचा शहराबाहेर फारसा संपर्क नाही किंवा त्यांचा ग्रामीण मतदारांसोबत फारसा परिचयदेखील नाही. त्यामुळे ते प्रामुख्याने शहरातील दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मते खेचतील आणि नेमके हेच काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते. असा कयास काढला जातो की, शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन ओवेसी यांची येथे सभा झाली, तर वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण