शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 3:43 PM

काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 

औरंगाबाद : ‘लोकांच्या मनात काही तरी खदखदतेय... परिवर्तनाची सुप्त लाट आलेली आहे,’ असे सूचक वक्तव्य आज येथे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जालना रोडवर आकाशवाणीसमोर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. 

त्यांनी सांगितले की, ३२ वर्षे ‘यांना’ आपण वाढू दिले. आता तर यांनी जाहीरच करून टाकले की, शहराला आठ दिवसांनंतर पाणी येईल. कचऱ्याच्या प्रश्नाने किती उग्र रूप धारण केले, हे आपण साऱ्यांनीच अनुभवले आहे. शहराचा व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता बदल गरजेचा आहे. तो आपण करूया. 

यावेळी माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी उपमहापौर तकी हसन, शेतकरी स्वाभिमान संघटनेचे चंद्रशेखर साळुंके पाटील, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे आदींची भाषणे झाली. प्रारंभी, उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रास्ताविक केले. ‘चला, बदल घडवू या’ असा नारा त्यांनी दिला.

मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  श्रीहरी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मानसिंग पवार, सुधाकर सोनवणे, प्रकाश मुगदिया, छाया जंगले पाटील, फैय्याज कुरेशी, अ‍ॅड. सय्यद अक्रम,  डॉ. जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण आदींची उपस्थिती होती. 

गांधी-नेहरू घराण्याचा अभ्यास करून बोलास्वातंत्र्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशासाठीचे बलिदान सर्वश्रुत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच जिवापाड झटत असतात.  असे असतानाही पंतप्रधान  त्यांच्यावर टीका करीत सुटले आहेत, हे निषेधार्ह होय, असे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादcongressकाँग्रेसSubhash Zambadसुभाष झांबड