शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : हौशी मतदाराने मतदानाचा व्हिडिओ केला टिकटॉकवर पोस्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:29 IST

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

औरंगाबाद : शहरातील एका हौशी मतदाराने मतदान करीत असल्याची मोबाईलवर क्लीप तयार करून ती टिकटॉक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हायरल केली. याबाबत वृत्त वाहिन्यांवर बातमी प्रकाशित होताच, शहर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. मतदान हे गोपनीय आहे. गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल व्हिडिओ तयार करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

बोगस मतदानाच्या संशयावरून एक ताब्यातसिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाकीर हुसेन शाळेतील मतदान केंद्रात एक तरुण बोगस मतदान करण्यासाठी उभा असल्याचा संशय उमेदवारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, आपण मतदान करण्यासाठी आलो आहोत, आपण बोगस मतदान केले नाही, असे त्याचे म्हणणे होते. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

पोलिसांच्या उपाययोजना आल्या कामीलोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही. प्रखर उन्हामुळे मतदारांनी सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने रांगेत थांबलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रात्री ८.३० वाजले.

औरंगाबाद  आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.२३) सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत व्हावे, याकरिता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे सकाळी ७ वाजताच घराबाहेर पडले होते. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह अन्य अधिकारी सतर्क होते. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. यामुळे कोणतीही गडबड झाली नाही. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत आज संपूर्ण शहरात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019