शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

लोकसभा : आज मतमोजणी

By admin | Updated: May 16, 2014 00:15 IST

उस्मानाबाद: लोकसभा निवडणुकीची शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे़

 उस्मानाबाद: लोकसभा निवडणुकीची शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे़ उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात होणार्‍या मतमोजणी पूर्वतयारीचा निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ रमेश नारनवरे यांनी पाहणी करून आढावा घेतला़ आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी करण्यासाठी १४ टेबलांची मांडणी करण्यात आली आहे़ प्रारंभी टपाली मतपत्रिकेची नोंदणी होणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतमोजणी करण्यात येणार्‍या कक्षांची पाहणी केली़ उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी ६़४५ वाजता बोलविण्यात आले आहे़ ज्या मार्गावरून संबंधितांना प्रवेश आहे, त्याच मार्गावरून त्यांनी प्रवेश करावा, ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाऊ नये आदी सूचना त्यांनी केल्या़ उमेदवार किंवा प्रतिनिधींना केंद्रात प्रवेश करताना मोबाईल व आधुनिक संपर्क साधने नेण्यास मनाई करण्यात आली आहे़ मतदान मोजणी केंद्रातून इतर विधानसभा मतदान मोजणी केंद्रात प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्यास अशा मतमोजणी प्रतिनिधींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख जे़टी़पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे व सर्व मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी) संवेदनशील गावात बंदोबस्त मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संवेदनशील गावांसह ठिकाणांवरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ अशा गावांमध्ये फिरते पथक, फिक्स पॉइंटवर पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत़ कायदा-सुव्यवस्था बिघडवू पाहणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे़ प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यात १६ ते १८ मे या कालावधीत कलम १३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत़ या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़