शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

मानेगाव प्रा.आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST

जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांना येथून उपचार मिळेनासा झाला आहे.

जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांना येथून उपचार मिळेनासा झाला आहे. सतत मागणी करूनही जि.प. आरोग्य विभागातील अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारपासून आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे.या आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी, ३ परिचारिका आणि एक वार्डबॉय अशा सहा जणांचा स्टाफ आहे. परिसरातील १८ गावे आरोग्य सोयीसाठी या केंद्राला जोडण्यात आलेली आहेत. परंतु गेल्या महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी केंद्रात हजरच राहत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन महागडी सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर रविवारी शेतात काम करणाऱ्या दोन महिलांवर रानडुकराने हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते.वैद्यकीय अधिकारी नितीन शहा यांच्याशी जखमी महिलांच्या नातेवाईकांनी दुरध्वनीवरून वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. गेल्या तीन दिवसांपासून हे कुलूप कायम आहे. जखमी महिलांना अन्य दवाखान्यात हलविण्यात आले. मानेगाव येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. या शिष्टमंडळात नितीन भोकरे, रामेश्वर सवणे, सचिन भोकरे, लक्ष्मण जाधव, सुंदर ढेंगळे, कृष्णा पोटरे, निवृत्ती पितळे, संतोष ढेंगळे, कैलास ढेंगळे, कैलास कळकुंबे आदींचा सहभाग होता. ग्रामस्थांनी दुपारपर्यंत कुलूप काढलेले नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)