शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांचे होईल ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:56 IST

ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे.

ठळक मुद्दे पूर्वपदावर येत असताना आता आणखी दोन आठवडे मागे जाण्याची भीती

औरंगाबाद : प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नऊ दिवसांच्या काळात औरंगाबादेतील उद्योगांचे जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. 

शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे. त्याला रोख लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० ते १८ जुलैदरम्यान नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे. सततच्या खंडामुळे ग्राहकांचा विश्वास राहणार नाही. ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे. लॉकडाऊनचा निर्णय दुर्दैवी आहे, असे मत ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केले. 

अगोदरच ४०-४५ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. आता कुठे उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होते. ४०-५० टक्क्यांपर्यंत उत्पादन सुरू झाले होते. असे असताना आता आणखी नऊ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांची घडी विस्कटीत होईल. पुन्हा इथपर्यंत येण्यासाठी दोन आठवडे मागे जावे लागेल, अशी खंत ‘मासिआ’चे सहसचिव विनय राठी व कार्यकारिणी सदस्य मनीष अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

दुसरीकडे, मकरंद देशपांडे यांनी कामगारांवर आणखी बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे, अशी भीती व्यक्त केली. अगोदरच उद्योगांसमोर दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संकटात आले आहेत. वेतन देण्याची क्षमता राहिलेली नाही. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आता आणखी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे रोजगाराची समस्या भेडसावणार आहे, असेही ते म्हणाले. 

८० लाख मानवी तासांचे नुकसान  नऊ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दोन आठवडी सुट्या सोडल्या, तर उर्वरित ७ दिवसांत उद्योगांचे साधारणपणे ८० लाख मानवी तासांचे नुकसान होऊ शकते. औरंगाबाद व लगतच्या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींतील सर्व प्रकारच्या ४ हजार ९०० उद्योगांमध्ये १ लाख ६० हजार कामगार कार्यरत असून, सात दिवसांत सर्व शिफ्ट मिळून ते १० लाख दिवस काम करतात. प्रशासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र, यापुढेही सतत लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ आली, तर इथल्या उद्योग क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील. इथे उद्योग येण्याऐवजी येथे कार्यरत उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. - कमलेश धूत, अध्यक्ष, सीएमआयए 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या