शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरीत शुकशुकाट; संचारबंदीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:19 IST

या परिसरात केवळ औषधी दुकाने आणि उद्योग सुरु ठेवण्यात आली आहेत.

औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी शनिवारपासून १२ जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीतून केवळ दवाखाने-औषधी दुकाने आणि उद्योगांना सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने उद्योजकांना कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने कारखान्यातील कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी दुपारी संपूर्ण परिसरात पाहणी केली असून संचारबंदिस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याची माहिती दिली आहे. 

बजाजनगर या कामगार वसाहतीत कोरोनाचा उद्रेक झाला असून, अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच  पंढरपूर, सिडको वाळूज महानगर, वाळूज याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ४ ते १२ जुलैदरम्यान वाळूज महानगर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारपासून वाळूज उद्योगनगरीतील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याकाळात भाजीपाला मार्केट, किराणा आदी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

औषधी दुकाने व कारखाने सुरूच राहणारसंचारबंदीतून दवाखाने- औषधी दुकाने आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना वगळण्यात आले आहे. सर्व प्रकाराचे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा, सण व उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्योग सुरू ठेवणाऱ्या कंपनीतील कामगार, अधिकारी व उद्योजकांना कंपनीत ये-जा करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून पास वितरित करण्यात आले आहेत. 

२७५ पथकांच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरुअनेक ठिकाणाहून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने संचारबंदी लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. वाळूज औद्योगिक नगरीत संचारबंदी लागू करण्यात आली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी निर्धार केला आहे. आरोग्य विभागाच्या २७५ टीम घरोघरी सर्वेक्षण करून बाधितांचा शोध घेत आहेत. - उदय चौधरी, जिल्हाधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद